‘कर्तृत्ववान पिढी घडविण्याची मिळाली संधी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कर्तृत्ववान पिढी घडविण्याची मिळाली संधी’
‘कर्तृत्ववान पिढी घडविण्याची मिळाली संधी’

‘कर्तृत्ववान पिढी घडविण्याची मिळाली संधी’

sakal_logo
By

उंड्री, ता. ४ ः ‘‘महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थी घडवीत असताना कर्तृत्ववान पिढी घडविण्याची संधी शिक्षक म्हणून मिळाली, ही बाब अभिमानाची आहे,’’ असे मत मनपा शाळा क्र. ८१-बीच्या मुख्याध्यापिका नलिनी चौधरी यांनी व्यक्त केले.
चौधरी पुढे म्हणाल्या, ‘‘पुणे विद्येचे माहेर घर असून, महापालिकेची शाळा ही माझी कर्मभूमी आहे. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, अधिकारी-पदाधिकारी घडविण्याची पालिका शाळेमध्ये संधी मिळाली. त्यातून पालिकेच्या शाळेमध्ये मुलगी झाल्यानंतर शून्य बिल असा उपक्रम राबविणारे डॉ. गणेश राख माझे विद्यार्थी असल्याचे सांगताना अभिमान वाटतो.’’ महापालिकेचे उपायुक्त विलास कानडे यांच्या हस्ते मुख्याध्यापिका डॉ. नलिनी चौधरी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, कामगार युनियनचे शिवाजी दौंडकर उपस्थित होते.