आंरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचा समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचा समारोप
आंरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचा समारोप

आंरराष्ट्रीय सिंधी संमेलनाचा समारोप

sakal_logo
By

उंड्री, ता. ८ : ''उद्योग व व्यवसायात चिकाटीने व मेहनतीने सिंधी समाजाने आपले अस्तित्व मोठे केले. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा गर्विष्ठ बनतो, उद्धट बनतो पण सिंधी समाजात माणूस जितका मोठा होतो, तितका तो नम्र होतो,'''' असे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले.

सुहिंना सिंधी-पुणे आणि अलायन्स ऑफ ग्लोबल सिंधी असोसिएशनच्यावतीने आयोजित २७ व्या आंतरराष्ट्रीय सिंधी संमेलन समारोपप्रसंगी पाटील बोलत होते. याप्रसंगी साई सद्रामजी, एजीएसएचे अध्यक्ष दत्तुक शाह, आयोजक सुहिंना सिंधी पुणेचे अध्यक्ष डॉ. पितांबर (पीटर) धलवाणी, आफ्रिकेचे वाणिज्य दूत रमण दासवानी, मोहन दुदाणी, दीपक रामचंदाणी, माजी आमदार गुरमुख जगवानी, हिरो शिवदासानी यांच्यासह सिंधी समाजातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, सिंधी समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध
देशाच्या जडणघडणीमध्ये सिंधी समाजाचे विशेष योगदान आहे. समाजाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. विकासाच्या दृष्टीने काही प्रस्ताव आल्यास त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून निश्चितच निर्णय घेऊ.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश रुपीजा व राजीव कृष्णानी यांनी स्वागत केले. कविता इसरानी, २०१३ च्या मिस इंडिया सिमरन अहुजा, किशन रामनानी, मोहित शेवानी यांनी सूत्रसंचालन केले.


उंड्री : सिंधी समाजाच्या साहित्य संमेलनामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करताना.