उंड्रीकरांचे पाचव्या दिवशीही उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उंड्रीकरांचे पाचव्या दिवशीही उपोषण
उंड्रीकरांचे पाचव्या दिवशीही उपोषण

उंड्रीकरांचे पाचव्या दिवशीही उपोषण

sakal_logo
By

उंड्री, ता. २४ ः पुणे महापालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी उंड्री ग्रामस्थांनी खंडेरायाचा जागरण-गोंधळ घातला, विठ्ठलाचे भजन केले. मात्र, प्रशासनाला जाग येत नाही, त्यामुळे उंड्रीकरांनी पाचव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पालिकेत येऊन चर्चा करण्याची विनंती केली. मात्र, उंड्री गाव कृती संघर्ष समितीने उपोषणस्थळी अधिकाऱ्यांनी चर्चा करावी, अशी ठाम भूमिका घेतली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी उंड्रीतील उपोषणकर्त्यांची भेट घेऊन संवाद साधला. पिंपरी-चिंचवड पालिकेसाठी एक आणि इतर गावांसाठी वेगळा नियम असू नये. उंड्रीसह ३४ ग्रामस्थांच्या मागण्यांविषयी आयुक्तांशी चर्चा केली जाईल, तसेच हा विषय विधीमंडळात मांडला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी समितीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण-पाटील, माजी नगरसेवक प्राची आल्हाट, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी उंड्रीकरांच्या उपोषणाला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला.
दरम्यान, पाणी, रस्ते, आरोग्य, वीज आदी मूलभूत सुविधा देत नाही, तोपर्यंत कर देणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. ग्रामस्थांनी पक्ष, मतभेद बाजूला ठेवून उपोषणाची धार तीव्र केली आहे. बारा वाड्या-वस्त्यांसह स्थानिक नागरिक रविवारी (ता.२५) रस्त्यावर उतरून उपोषणकर्त्यांना पाठिंबा देणार आहेत.