पालिकेने ज्या सालचे घर त्या सालचा कर लावा उंड्री गाव कृती संघर्ष समितीची पालिकेकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेने ज्या सालचे 
घर त्या सालचा कर लावा

उंड्री गाव कृती संघर्ष समितीची पालिकेकडे मागणी
पालिकेने ज्या सालचे घर त्या सालचा कर लावा उंड्री गाव कृती संघर्ष समितीची पालिकेकडे मागणी

पालिकेने ज्या सालचे घर त्या सालचा कर लावा उंड्री गाव कृती संघर्ष समितीची पालिकेकडे मागणी

sakal_logo
By

उंड्री, ता. २६ ः पालिकेच्या तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष वसंत सुतार आणि राजेश कामठे यांनी उंड्री गाव कृती संघर्ष समितीच्या उपोषणकर्त्यांची सोमवार, (ता.२६) यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी उपोषणकर्त्यांनी १९९७ साली समाविष्ट गावांना ज्या सालचे घर, त्या सालचा दर व नवीन मिळतींना एक रुपया निवासी व दोन रुपये बिगर निवासी प्रमाणे कर लावला होता. त्याच पद्धतीने कर आकारणी करावी, अशी मागणी उंड्री गाव कृती संघर्ष समितीच्या वतीने पत्राद्वारे केली.

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी रविवारी (ता.२५) उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पालिका आयुक्त आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. लवकरच याविषयावर चांगला निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी उपोषणकर्त्यांना दिले. हिवाळी अधिवेशनामध्ये पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप व सहकारी आमदार चेतन तुपे-पाटील यांनी उपोषणाबाबत आणि नव्याने समाविष्ट गावातील नागरिकांना सुविधा मिळत नाहीत, याबाबत मुद्दा मांडला. उंड्री गाव कृती संघर्ष समितीचे सातव्या दिवशी उपोषण सुरू आहे.