देसाई नेत्र रुग्णालयात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देसाई नेत्र रुग्णालयात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा
देसाई नेत्र रुग्णालयात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

देसाई नेत्र रुग्णालयात आंतरराष्ट्रीय कार्यशाळा

sakal_logo
By

उंड्री, ता. २६ ः डोळ्यांची स्थिती ओळखण्याचे आणि तपासण्याच्या प्रशिक्षणामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण जनतेला मोठा फायदा होणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा नेत्रचिकित्सक डॉ. प्रकाश रोकडे यांनी केले.
महंमदवाडी येथील एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामध्ये इंग्लंडमधील वर्ल्ड साइट फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. याप्रसंगी डॉ. राहुल देशपांडे, डॉ. सुचेता कुलकर्णी, डॉ. कुलदीप डोळे उपस्थित होते.
या कार्यशाळेमध्ये सरकारी आणि अशासकीय क्षेत्रातील प्राथमिक नेत्रसेविकांनी सहभाग नोंदवला. डॉ. अँथनी चिग्नेल आणि चार डॉक्टरांच्या पथकाने मार्गदर्शन केले.