‘कात्रज’ची एका दिवसात ९० हजार पिशव्या ताकविक्री उन्हाळ्याचा परिणाम; दुग्धजन्य थंड पदार्थांची मागणी वाढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘कात्रज’ची एका दिवसात ९० हजार पिशव्या ताकविक्री

उन्हाळ्याचा परिणाम; दुग्धजन्य थंड पदार्थांची मागणी वाढली
‘कात्रज’ची एका दिवसात ९० हजार पिशव्या ताकविक्री उन्हाळ्याचा परिणाम; दुग्धजन्य थंड पदार्थांची मागणी वाढली

‘कात्रज’ची एका दिवसात ९० हजार पिशव्या ताकविक्री उन्हाळ्याचा परिणाम; दुग्धजन्य थंड पदार्थांची मागणी वाढली

sakal_logo
By

कात्रज, ता. १४ : मे महिन्यात शहरात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून, दुधापासून तयार करण्यात येणाऱ्या थंडपेयांना मागणी चांगलीच वाढली आहे. तसेच दही, ताक, लस्सी, आम्रखंड, श्रीखंड, सुगंधी दूध, पनीरच्या विक्रीतही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. सद्यःस्थितीत पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाच्या कात्रज डेअरीकडून उत्पादित होत असलेल्या चार टन आइस्क्रीम आणि पाच टन दह्याची शहर आणि जिल्ह्यात दररोज विक्री होत आहे. तर दिवसाला ३६ लिटर म्हणजेच ९० हजार पिशव्या ताक पुणेकर फस्त करत आहेत.

मागील दोन वर्षांत लॉकडाउनमुळे विक्रीत काही प्रमाणांत घट झाली होती. परंतु, यावर्षी विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. शहरात मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा वाढला असून, एप्रिल आणि मे महिन्यात यामध्ये वाढ होत गेली. परिणामी, ग्राहकांकडून दुधाच्या तुलनेत थंड दुग्धजन्य पदार्थांच्या मागणी मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आइस्क्रीममध्ये बटरस्कॉच, मँगो, पेरू, व्हॅनिला असे विविध प्रकार आणि लस्सीमधील मँगो लस्सी अशी कात्रज डेअरीची विविध उत्पादने ग्राहकांच्या चांगलीच पसंतीला उतरत आहेत. त्यामुळे कात्रजमधील डेअरीच्या तिन्ही पार्लरवर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र कायम दिसून येते.

मागील दोन वर्षे लॉकडाउनचा फटका बसला होता. मात्र, यंदा कोरोनाचे नियम नसल्याने ग्राहक वाढल्याचे दिसून येत आहे. ग्राहकही थेट पार्लरवर येऊन खरेदी करण्यावर भर देत असून शीतपेयांची विक्री मोठ्या प्रमाणांत वाढली आहे. शितपेयांसोबत अन्य पदार्थांच्या विक्रीतही वाढ झाली आहे.
- केशर पवार, अध्यक्ष, कात्रज डेअरी

थंड पदार्थांची कात्रज डेअरीची रोजची विक्री
दही- ४ टन
आइस्क्रीम - ५ टन
साधे ताक - ६० हजार पिशव्या (३० हजार लिटर)
जिरा ताक- ३० हजार पिशव्या (६ हजार लिटर)
लस्सी - १२ हजार पॅकेट
पनीर ५०० किलो
श्रीखंड - ६०० किलो
आम्रखंड - ५०० किलो
सुगंधी दूध - ७५०० पिशव्या (१५०० लिटर)

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b21884 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top