कात्रज परिसरात गंभीर पाणीसंकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज परिसरात गंभीर पाणीसंकट
कात्रज परिसरात गंभीर पाणीसंकट

कात्रज परिसरात गंभीर पाणीसंकट

sakal_logo
By

पाणी सोडताना प्रशासन दुजाभाव
कात्रज परिसरातील नागरिकांचा प्रशासनावर आरोप
कात्रज, ता. १७ : कात्रज परिसरात मोठ्या प्रमाणात पाणीसंकट निर्माण झाले आहे. पाणी सोडताना प्रशासन दुजाभाव करत असल्याचा आरोप नागरिकांतून होत असून पाणीचोरी होत असल्याची तक्रारही नागरिक करत आहेत. परिसरात पाणीपुरवठा होणाऱ्या राजीव गांधी पंपिंग स्टेशनद्वारे महादेवनगर टाकीला व केदारेश्वर टाकीला जवळजवळ ६२ ते ६३ एमएलडी समान पाणी सोडणे गरजेचे आहे. दोन्ही टाक्यांअंतर्गत समान पाणीपुरवठा होणारा भाग आहे, परंतु, त्यापैकी महादेवनगर येथील पाण्याच्या टाकीला फक्त १२ ते १३ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित ५० एमएलडी पाणी हे केदारेश्वर पाण्याच्या टाकीला दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

जुना प्रभाग क्रमांक ३८लगत असणाऱ्या महादेवनगर टाकीमधून कात्रज-कोंढवा रस्ता, भारतनगर, दत्तनगर, जाधवनगर, राजस सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुखसागरनगर भाग१, भाग२, राजीव गांधीनगर, निंबाळकरवस्ती भागाला पाणी पुरवठा केला जातो. तसेच, या पाण्याच्या टाकीमधून जुना प्रभाग क्रमांक४० मधील कात्रज गावठाण, संतोषनगर व प्रभाग क्रमांक ४१मधील शिवशंभूनगर, गोकुळनगर या भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे केदारेश्वर टाकीमधून प्रभाग क्रमांक ४१मधील कोंढवा गावठाण, येवलेवाडी, टिळेकरनगर व प्रभाग ४१च्या भागाला पाणीपुरवठा केला जातो. अशावेळी २ ते ३जून रोजी घेतलेल्या क्लोजरच्या आधीपासून कमी प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे.

कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता यांच्याशी याबाबत सातत्याने संपर्क केला. त्यानंतर याविषयी कोणालाही या बाबतची माहीती नसल्याचे जाणवले व त्यांनीदेखील या बाबत शहानिशा केली असता असे होत आहे हे स्वीकारले आहे. यातून सरळसरळ पाण्याची चोरी होत असल्याचे दिसून येते. पंपिंग स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली हा गलथान कारभार सुरू आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करत पाणीपुरवठा सुरळीत करावा. - प्रतीक कदम, अध्यक्ष प्रगती फाउंडेशन

या विषयावर कर्मचाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पाणीपुरवठा असमान होण्यामागे विविध कारणे असू शकतात. त्याचा शोध घेण्यात येईल आणि तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल. आतिश जाधव, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b22256 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top