युनिक स्कूलचा निकाल १०० टक्के | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युनिक स्कूलचा निकाल १०० टक्के
युनिक स्कूलचा निकाल १०० टक्के

युनिक स्कूलचा निकाल १०० टक्के

sakal_logo
By

कात्रज, ता. २१ : दहावीच्या परीक्षेत गोकुळनगर येथील ''ईगल एज्युकेशन सोसायटी संचालित युनिक इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा'' १०० टक्के निकाल लागला आहे. २०२१-२२मध्ये विद्यालयाचे १३६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील पुष्कर मोहिते याने ९५ टक्के मिळवून प्रथम, यश ओस्तवाल याने ९४.२० टक्के मिळवून द्वितीय, तर निधी डाळवाले हिने ९४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
विद्यालयातील ८३. ८२टक्के विद्यार्थी विशेष श्रेणीमध्ये, तर १४. ७० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झाले. युनिक विद्यालयाच्या उत्तुंग निकालाची परंपरा यंदाही कायम राखल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी, मुख्याध्यापिका जयश्री जाधव व उपमुख्याध्यापिका सुनीता चांदगुडे तसेच, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b22323 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top