खड्ड्याने वाहनचालकांची वाट बिकट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खड्ड्याने वाहनचालकांची वाट बिकट
खड्ड्याने वाहनचालकांची वाट बिकट

खड्ड्याने वाहनचालकांची वाट बिकट

sakal_logo
By

कात्रज, ता. १२ : डांबरीकरण केल्यानंतर महिनाभरातच कात्रज-कोंढवा रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. खड्ड्यामुळे वाहनचालकांची वाट बिकट झाली असून रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणत्या प्रकारचे डांबरीकरण केले आहे, असा प्रश्न नागरिक करत आहेत. मुळात हा रस्ता अरुंद असून जड व इतर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नित्याची वाहतूक कोंडी आणि अपघाताची मालिका सुरू असताना महापालिका प्रशासनाने अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अर्धवट काम करून नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळले असल्याची संतप्त भावना नागरिकांमध्ये आहे.
अतिक्रमणांवर महापालिका बांधकाम विभागाने कारवाई केल्यानंतर पथविभागाकडून डांबरीकरण व साईडपट्ट्याचे काम सुरु केले होते. त्यासाठी पाच कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यापैकी दीड कोटी रुपयांचे काम आतापर्यंत पथ विभागांकडून केले आहे. त्यामुळे हे काम पावसाळ्याआधी पूर्ण तर केलेच नाही. परंतु, काम केलेल्या ठिकाणीसुद्धा रस्त्याची पुन्हा दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी डांबरीकरण केलेल्या ठिकाणी रस्त्यांवर छोटे-मोठे खड्डे पडून पाणी साचले. तर अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी वाहत असल्याने चरा पडल्या. त्याचबरोबर, चेंबर खचल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.

रस्त्याची दुरवस्था आणि वाहतूककोंडीमुळे रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून चालावे लागते. सामान्य नागरिकांची एवढी अडचण होत असेल तर ज्येष्ठ नागरिकांनी या रस्त्यांवरून कसे चालायचे, त्यात अर्धवट कामे करून प्रशासन नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे.
- डॉ. सुचिता भालेराव, स्थानिक नागरिक

खडीमशीन चौकातून कात्रज चौकात येण्यासाठी तासभर लागतो. त्यात रस्त्यांवर खड्डे असल्याने वाहनात बिघाड होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या रस्त्यावरून प्रवास करत असताना नेहमी नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागते.
- राहुल जगदाळे, वाहनचालक

‘एल अँड टी’चे काम चालू असल्याने आम्हाला पूर्ण रस्त्यावर डांबरीकरण करता आले नव्हते. कात्रज-कोंढवा रस्त्यांवर अर्धवट डांबरीकरण झालेले आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली त्याची पाहणी करून निर्णय घेण्यात येईल.
- धनंजय गायकवाड, उपअभियंता, पथविभाग

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b22631 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top