पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग बंद
पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग बंद

पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग बंद

sakal_logo
By

खडकवासला, ता. १९ : खडकवासला धरण साखळीतील पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग मंगळवारी सकाळी सहा वाजता पूर्ण बंद केला. या आठ दिवसांत ३.३४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले. धरण सध्या १०० टक्के भरले आहे. परंतु या धरणावर व पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाला. ओढ्याचे पाणी कमी होत गेल्याने धरणातील येवा कमी झाला. धरणात मंगळवारी संध्याकाळी सुमारे एक हजार क्युसेकचा येवा सुरू आहे. ते पाणी कालव्यातून शेतीसाठी सोडले जात आहे. धरणातील विसर्ग एक हजार ७१२ क्युसेक सुरू होता. तो मंगळवारी पहाटे पाच वाजता ८५६ क्युसेक केला आणि सहा वाजता पूर्ण बंद केला. खडकवासला धरण साखळीत मिळून एकूण पाणीसाठा १९.०९ टीएमसी झाला आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांनंतर आता टेमघर धरणही निम्मे भरले आहे.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजताची स्थिती
धरणाचे नाव / एकूण क्षमता (टीएमसी) / उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी) / टक्केवारी / मागील ११ तासांतील पाऊस (मिलिमीटरमध्ये)
खडकवासला- 1.97/1.97/100/1
पानशेत- 10.65/7.24/68.00/8
वरसगाव- 12.82/7.93/61.85/8
टेमघर- 3.71/1.94/52.46/20
मंगळवारचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 19.09 टीएमसी/65.48टक्के

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b22775 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top