सिलिंडरसाठी नागरिकांना प्रतिक्षाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिलिंडरसाठी नागरिकांना प्रतिक्षाच
सिलिंडरसाठी नागरिकांना प्रतिक्षाच

सिलिंडरसाठी नागरिकांना प्रतिक्षाच

sakal_logo
By

कात्रज, ता. २५ : गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या (एचपी) सिलिंडरचा पुरवठा वेळेत होत नसल्याचे समोर आले आहे. नोंदणी करूनही नागरिकांना वेळेत गॅस सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. एकीकडे हजार रुपयांच्या पुढे गेलेली किंमत आणि दुसरीकडे विस्कळित पुरवठा अशा कात्रीत कात्रज, आंबेगाव, बिबवेवाडी, कोंढवा परिसरातील नागरिक सापडले आहेत.
काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर एका दिवसात मिळत असे. परंतु, आता तो मिळत नसल्याने ग्राहकांची अडचण होत आहे. शहरातील एचपी गॅस सिलिंडरच्या वितरकांकडे काही हजार गॅसजोड आहेत. अशावेळी एकच टाकी असणाऱ्या ग्राहकांना कसरत करावी लागत आहे. त्यात एजन्सीकडून एक टाकी असणाऱ्या ग्राहकांना दुकानांवर येऊन टाकी घेऊन जाण्यास सांगण्यात आल्याचे प्रकार घडत आहेत. नागरिकांना नोंदणी करूनही गॅस वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी ‘सकाळ’कडे केल्या आहेत.
‘‘कंपनीकडून वाहतूक करताना पावसामुळे अडचणी निर्माण झाल्याने सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होत नाही. म्हणून नोंदणीनंतर ग्राहकांना सिलिंडर पोहोचविण्यास उशीर होत आहे. अशावेळी एकच टाकी असणाऱ्या ग्राहकांना तत्काळ टाकी हवी असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे दोन टाक्या उपलब्ध असणाऱ्या ग्राहकांनाही अडचणी येतात’’ अशावेळी आम्ही अनेकांना दुकानांवर येऊन टाकी घेऊन जाण्यासही सांगितलेले असल्याची कबुली कात्रज, धनकवडी परिसरातील गॅस एजन्सींनी दिली आहे.

या महिन्यात आम्ही गॅस नोंदणी केल्यापासून चार दिवस टाकी आलीच नाही. शेवटी आम्ही थेट दुकानांवर जाऊन टाकी आणली. यापूर्वी नोंदणी केल्यानंतर एका दिवसात टाकी घरपोच होत होती.
- गीता पाथारकर, गृहिणी

वितरकांशी बोलून आम्ही या अडचणी सोडविण्याचा आम्ही प्रयत्न करु. मात्र, अनेक ग्राहकांकडे एकच टाकी आहे. सिलिंडर संपल्यास त्यांना तत्काळ बदलून हवा असतो. मात्र, अनेकवेळा ते शक्य होत नाही. त्यामुळे अडचणी निर्माण होतात.
- एच पी गॅस वितरण अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b22848 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..