बारामतीत भाजप विजयश्री खेचून आणणार : प्रा. राम शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत भाजप विजयश्री 
खेचून आणणार : प्रा. राम शिंदे
बारामतीत भाजप विजयश्री खेचून आणणार : प्रा. राम शिंदे

बारामतीत भाजप विजयश्री खेचून आणणार : प्रा. राम शिंदे

sakal_logo
By

सिंहगड रस्ता, ता. ५ : ‘‘आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात भाजप विजयश्री खेचून आणणार आहे. त्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली,’’ अशी माहिती प्रा. राम शिंदे यांनी दिली.

सिंहगड रस्ता भागातील मुक्ताई गार्डन येथे बारामती लोकसभा मतदार संघअंतर्गत खडकवासला विधानसभा मतदार संघाची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीस प्रा. राम शिंदे यांच्यासह खडकवासला मतदार संघाचे आमदार भीमराव तापकीर, मतदार संघाचे अध्यक्ष सचिन मोरे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, किसान आघाडी अध्यक्ष वासुदेव काळे आदी उपस्थित होते. बूथ सक्षमीकरण, बूथ विस्तार योजना, बूथ प्रमुख नेमणे, भाग प्रमुख या सगळ्या पातळीवर आढावा घेतला, असेही त्यांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात प्रभारी म्हणून काम करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणूक नियोजन बैठकी अंतर्गत या आढावा बैठका घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

आगामी निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्यात आला. यासोबतच केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांचा २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या दौऱ्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने ही सोमवारी (ता.५) आढावा बैठक घेतली होती. संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्ट्या दौरा यशस्वी करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. खडकवासला मतदार संघातून भाजपला मोठ्याप्रमाणात मताधिक्य मिळते. मात्र, इतर विधानसभा मतदारसंघातून देखील तसेच मताधिक्य मिळवण्यासाठी विहर रचना आखण्याच्या दृष्टिकोनातून ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. २०१९ साली हर्षवर्धन पाटील निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये असते तर, आज चित्र वेगळे राहिले असते. बारामती लोकसभा मतदार संघात आतापर्यंत दोनदा अपयश आले आहे. मात्र, तिसऱ्यांदा यशश्री खेचून आणणार असल्याचा विश्वास प्रा. शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी खडकवासला मतदार संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त विशेष सत्कार केला. यावेळी मतदार संघाचे सरचिटणीस अश्विन शिंदे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b23497 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..