आतकरवाडीत पावसामुळे पुन्हा रस्त्यावरच अंत्यविधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आतकरवाडीत पावसामुळे पुन्हा रस्त्यावरच अंत्यविधी
आतकरवाडीत पावसामुळे पुन्हा रस्त्यावरच अंत्यविधी

आतकरवाडीत पावसामुळे पुन्हा रस्त्यावरच अंत्यविधी

sakal_logo
By

खडकवासला, ११ : घेरा- सिंहगड ग्रामपंचायत हद्दीत रविवारी दुपारनंतर मुसळधार पाऊस पडल्याने आतकरवाडी येथील एक व्यक्तीवर मुख्य रस्त्यावरच अंत्यविधी करावे लागले.
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीत स्मशानभूमी नाही. ओढ्यालगत शेताच्या बांधावर छोट्याशा जागेत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, पाऊस आल्यावर ओढ्याला जास्त पाणी असते. त्यावेळी तेथे पोचणे शक्य होत नाही. त्यामुळे रस्त्यावरच अंत्यविधी करण्याशिवाय पर्याय नसतो.
एक व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांनी पाऊस आणि ओढ्याचे पाणी कमी होण्याची तीन तास वाट पाहिली. अखेर ग्रामस्थांनी भर पावसातच रस्त्यावरच अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.
ग्रुप ग्रामपंचायत घेरा सिंहगडला चार महसुली गावे असून गावठाणच नाही. त्यामुळे अंत्यविधी करण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b23588 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..