टेरेसवर फुलली ३०० कुंड्यांची बाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेरेसवर फुलली ३०० कुंड्यांची बाग
टेरेसवर फुलली ३०० कुंड्यांची बाग

टेरेसवर फुलली ३०० कुंड्यांची बाग

sakal_logo
By

वडगाव शेरी, ता. १५ ः जुने टायर, रंगाच्या बादल्या, जुने फर्निचर यांचा कल्पकतेने वापर करून फळझाडे, फुलझाडे आणि नेत्र सुखद अनुभव देणाऱ्या बागेतील वेली पाहिल्या की मन प्रसन्न होते. विशेष म्हणजे छोट्याशा जागेत टेरेसवर अशी बाग फुलवण्याची किमया वडगाव शेरी येथील एका निसर्गप्रेमी कुटुंबाने साधली आहे. विशेष म्हणजे त्यांनी ही बाग रंगाच्या बादल्या, टायर यामध्ये फुलवली आहे.

बजाज कंपनीत काम करणारे मकरंद चिकणे व त्यांचे बंधू तुषार चिकणे यांनी मिळून टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेतून गणेश नगर येथील गल्ली नंबर १५ मध्ये आपल्या घराच्या टेरेसवर सुंदर बाग फुलवली आहे. त्यांच्या बागेत या घडीला सुमारे ३०० कुंड्यांमध्ये ५० प्रकारची फळ झाडे, फुल झाडे त्यांनी फुलवले आहेत. कोकोपिट साठ टक्के, माती तीस टक्के आणि पालापाचोळा दहा टक्के असा वापर त्यांनी केला आहे. त्यांच्या या टेरेस गार्डनमध्ये पेरू, सिताफळ, डाळिंब, चिक्कू, आंबा, लिंबू, रातराणी, मोगरा, सिंगापुरी चाफा, जास्वंद, गुळवेल, मिरची, वांगी अशा फुले, फळे, भाज्या पाहायला मिळतात.

व्हरटिकल गार्डन, आकर्षक स्टॅँड टायरचा वापर, काढलेली चित्रे यामुळे टेरेस गार्डन आकर्षक झाले आहे. कुटुंबातील सर्व सदस्य या टेरेस गार्डनसाठी वेळ देतात. त्याची निगा राखतात. येथे तयार झालेला पालापाचोळा आणि घरातील ओला कचरा सेंद्रिय खत बनवण्यासाठी वापरला जातो.

मन प्रसन्न होते
मकरंद चिकणे म्हणाले, टेरेसवर जागा उपलब्ध असल्याने घराच्या रंग कामाच्या शिल्लक बादल्यांवर आम्ही रंगरंगोटी करून त्यांचा कल्पकतेने वापर केला आहे. टेरेसवर मातीचे वजन होऊ नये याकरता कोकोपीट वापरले आहे. रोज बागकाम केल्यामुळे मनावरचा ताण हलका होतो, मन प्रसन्न होते.

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b23627 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..