कात्रज चौकात अपघातात एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज चौकात अपघातात एकाचा मृत्यू
कात्रज चौकात अपघातात एकाचा मृत्यू

कात्रज चौकात अपघातात एकाचा मृत्यू

sakal_logo
By

कात्रज, ता. ४ : कात्रज चौक ते नवले पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुपारी साडे तीनच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने अनोळखी व्यक्तीला धडक दिली. चाक डोक्यावरून गेल्याने त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली. अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक रवींद्र थोरात यांनी दिली. या अपघातामुळे कात्रज चौकात काहीवेळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.