अनाधिकृत बांधकामांप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनाधिकृत बांधकामांप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
अनाधिकृत बांधकामांप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

अनाधिकृत बांधकामांप्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

sakal_logo
By

खडकवासला, ता. ८ : अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी सुरू करण्याविषयी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेऊन हा विषय मार्गी लावला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी दिली.

शहरालगतच्या गावांमध्ये ग्रामपंचायत काळात झालेल्या अनधिकृत बांधकामांची दस्तनोंदणी सध्या बंद आहे. ती सुरू करण्याची रमेश कोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवारी लोहगाव विमानतळावर भेट घेतली. ‘‘ स्थानिक भुमीपुत्रांनी एकत्र येऊन काही बांधकामे केलेली आहेत. त्या बांधकामांची दस्त नोंदणी होत नसल्यामुळे व्यावसायिक अडचणीत आलेले आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी दस्त नोंदणी सुरू करावी,’’ अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे केली.

संदीप खर्डेकर यांनी न्यायालयाचा कोणताही स्थगिती आदेश नसताना महसूल खात्याने दस्तनोंदणी बंद ठेवली असून त्यामुळे छोटे घर खरेदी केलेले सामान्य नागरिक अडचणीत आले असल्याचे सांगितले. यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल व दस्तनोंदणी सुरु करण्याबाबत लवकरच बैठक घेऊन निर्णय करू, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, उपजिल्हाप्रमुख अण्णा दिघे उपशहर प्रमुख नीलेश गिरमे, युवासेनेचे नीलेश घारे, तेजस पाबळे, भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, बांधकाम व्यावसायिक सारंग राडकर, बाजार समितीचे माजी संचालक राहुल घुले, माजी उपसरपंच सुभाष नाणेकर, अतुल धावडे, दत्ता मारणे, सुभाष शिंदे, किरण वांजळे, नीलेश काळभोर, काका खवले, सतीश वांजळे, बागी धावडे, राहुल वांजळे यावेळी उपस्थित होते.
36411