सरकार बदलण्याचे काम कात्रजमधूनच ः सावंत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरकार बदलण्याचे काम
कात्रजमधूनच ः सावंत
सरकार बदलण्याचे काम कात्रजमधूनच ः सावंत

सरकार बदलण्याचे काम कात्रजमधूनच ः सावंत

sakal_logo
By

कात्रज, ता. ९ : राज्यातील महाविकास आघाडी सरकार बदलण्याचे काम कात्रजमधील आपल्या सावंत विहार सोसायटीमधून झाल्याचा दावा आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला आहे.
सावंत विहारमधील आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. संबंधित जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग नागरिकांनी करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. परिसरातील नागरिकांच्या वतीने तानाजी सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गिरिराज सावंत, ॲड. दिलीप जगताप, शंकर कडू आदींसह परिसरातील नागरिक, पदाधिकारी उपस्थित होते. सावंत म्हणाले, ‘‘भागातील सर्व नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी, विविध योजना संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी या कार्यालयाचा सर्वांनी लाभ घ्यावा. मी कामानिमित्त महाराष्ट्रभरात कुठेही असलो तरी माझ्याशी संपर्क करणे सुलभ व्हावे, या हेतूने जनसंपर्क कार्यालयाचे नियोजन करण्यात आले आहे.’’ गिरिराज सावंत यांनी प्रास्ताविक केले.