गायीच्या दुधाचा दर ५४ रुपयांपेक्षा जास्त नसावा दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत विविध ठराव मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गायीच्या दुधाचा दर ५४ रुपयांपेक्षा जास्त नसावा
दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत विविध ठराव मंजूर
गायीच्या दुधाचा दर ५४ रुपयांपेक्षा जास्त नसावा दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत विविध ठराव मंजूर

गायीच्या दुधाचा दर ५४ रुपयांपेक्षा जास्त नसावा दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत विविध ठराव मंजूर

sakal_logo
By

कात्रज, ता. ३० : ‘‘गायीच्या दुधाचा दर ५४ रुपयांपेक्षा जास्त नसावा, असा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. परराज्यातील दुग्ध व्यवसायिकांचे राज्यातील होणारे आक्रमण, त्यामुळे दूध खरेदी-विक्रीच्या दरावर होणारे प्रतिकूल परिणाम आणि दुग्ध व्यवसायात निर्माण होत असलेली अनिष्ट स्पर्धा व व्यवसायापुढील इतर अडी-अडचणींबाबत चर्चा करत राज्यातील सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा पार पडली.

दूध खरेदी व विक्री दरात सर्वत्र एकवाक्यता असावी याबाबत चर्चा होऊन दूध विक्रीदरात वाढ करताना ग्राहक किंमत ५४ रुपयांपेक्षा जास्त नसावी. तसेच, डीलर ते एमआरपीमध्ये ५ रुपयांपेक्षा जास्त अंतर नसावे असे धोरण असावे त्यामुळे दरवाढ होत असली तरी त्याचा बोजा ग्राहकांवर पडणार नाही, असे एकमताने ठरविण्यात आले.

दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के, कात्रज डेअरीचे उपाध्यक्ष रामदास दिवेकर यांच्यासह राजहंस, चितळे, शिवामृत, दूधपंढरी, थोटे, स्फूर्ती, संतकृपा, ऊर्जा, सोनाई, पराग, गोविंद, नवनाथ, कन्हय्या, कृष्णा, सुरुची, साने, श्री गणेशा आदी सहकारी व खासगी दूध संघाचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. त्याचबरोबर दुधाच्या खरेदी-विक्री दरात एकसुत्रतेचा अवलंब सर्वांनी करावा, राज्य सरकारने दूध उद्योगासाठी सर्वसमावेशक धोरण आणावे, शासन नियुक्त संयुक्त समितीच्या नियमितपणे बैठका व्हाव्यात, पनीरसह दुग्धजन्य पदार्थांच्या भेसळखोरांना रोखण्यास संयुक्त फिरत्या पथकाची नियुक्ती करावी, हे ठराव या बैठकीत संमत झाले.