बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

कात्रज, ता. ४ : जुना बोगदा घाट रस्त्यावर भिलारेवाडीजवळ शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एसटी बस व दुचाकी यांचा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच मागे बसणारा मित्र किरकोळ जखमी झाला. दुचाकीने अमोल टकले (वय १८, रा. नानापेठ) व त्यांचा मित्र खेड शिवापूरकडून शहराकडे येत होता, त्यावेळी कात्रजकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या बसमध्ये अपघात झाला. त्यात दुचाकीचालक टकले यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली. या अपघातामुळे कात्रज चौकाकडून जुन्या बोगद्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती.