‘विरोधकांच्या दिशाभुलीपासून सावध रहावे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विरोधकांच्या दिशाभुलीपासून सावध रहावे’
‘विरोधकांच्या दिशाभुलीपासून सावध रहावे’

‘विरोधकांच्या दिशाभुलीपासून सावध रहावे’

sakal_logo
By

औंध, ता. ५ : पंतप्रधानांनी दोन लाख कोटींपेक्षा जास्त प्रकल्प महाराष्ट्रासाठी मंजूर केले असून, ज्या लोकांनी अडीच वर्षांत केवळ केंद्राला शिव्या घालण्याशिवाय काही केले नाही, त्यांनी गुंतवणूक बाहेर गेल्याबाबत बोलणे चुकीचे आहे. बाणेर येथे एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केसरकर म्हणाले.

ज्यांनी दीड वर्षांत उद्योगासंदर्भात उच्चस्तरीय समितीची बैठकसुद्धा घेतली नाही त्या लोकांना असं म्हणण्याचा काही अधिकार नाही. हे केवळ ढोंग असून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल केली जात आहे. यापासून जनतेने सावध राहिले पाहिजे. आपल्या राज्याला पुढे घेऊन गेला पाहिजे. आम्ही राज्याला पुढे घेऊन जाताना कुठलेही राजकारण करणार नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवारांना भेटायला केवळ त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले. त्यामुळे यातून वेगळा अर्थ काढू नये. शरद पवार हे केवळ एका पक्षाचेच नेते नाहीत तर ते महाराष्ट्राचे नेते आहेत असेही केसरकर म्हणाले. आदित्य ठाकरे व सुषमा अंधारे यांच्या सभांना परवानगी नाकारल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, ‘‘तो स्थानिक प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात घेतलेला निर्णय आहे,’’ असे त्यांनी सांगितले.