केंद्रीय राज्यमंत्र्यांना कोंडीचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय राज्यमंत्र्यांना कोंडीचा फटका
केंद्रीय राज्यमंत्र्यांना कोंडीचा फटका

केंद्रीय राज्यमंत्र्यांना कोंडीचा फटका

sakal_logo
By

खडकवासला, ता. ११ : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांना शुक्रवारी पुण्यातील नऱ्हे येथील भारतीय जनता पक्षाच्या बैठकीला जाताना वाहतुकीचा फटका बसला.
पारी कंपनी चौक-श्री कंट्रोल-एस. के. बँक्वेट हॉल या अर्धा किलोमीटर परिसरात रोज वाहतूक कोंडी असते. शुक्रवारी देखील तीच परिस्थिती होती. मंत्र्यांच्या दौऱ्यातील वाहनांचा ताफा १० वाजता पोचला. त्यावेळी, नऱ्हे या औद्योगिक क्षेत्र असल्याने या परिसरातील कंपनीत येणारा कामगार वर्ग, शहराच्या वेगवेगळ्या भागात जाणारे नागरिक यामुळे रस्त्यावर गर्दी होती. येथील चार-पाच मोठी शैक्षणिक संकुल आहेत. नऱ्हे परिसरातील वाहतुकीच्या मानाने असणारे रस्ते अरुंद आहेत. जड वाहनांची वाहतूक, अशा प्रकारे जाणारे-येणारे विद्यार्थी व कामगार वर्ग, रस्त्यावर असलेले अतिक्रमण आणि फलक यामुळे वाहतूक कोंडी होत असते. आजच्या या दौऱ्यामुळे सिंहगड रोड वाहतूक पोलिसांची व ग्रामीण पोलिसांची धावपळ झाली.
मंत्री खडकवासला येथील केंद्रीय जल आयोगाच्या विश्रामगृहात मुक्कामी होते. तेथून ते नऱ्हे येथील बँक्वेट हॉलमधील कार्यक्रमास आले होते. येताना येथून नांदेड अंधशाळा डीएसके रस्ता, चव्हाण बाग, धायरी उंबऱ्या गणपती चौक, बेंकर वस्ती चौक, पारी चौक, श्री कंट्रोल चौक असा त्यांचा जाण्याचा मार्ग होता. जाताना धायरी गावातील उंबऱ्या गणपती चौक मार्गे, पारी कंपनी चौक, श्री कंट्रोल चौक या चौकात गर्दी होती.
मंत्री एस. के. बँक्वेटजवळ पोचताना त्यांच्या ताफ्यातील पायलट वाहनांच्या पुढे तीन-चार मोटार, डंपर होते. दुसऱ्या बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक चौकात पोलिस होते. ते वाहतूक नियोजन करीत होते. परंतु या परिसरात शुक्रवारीदेखील नेहमीप्रमाणे वाहतूक कोंडी, जड वाहतूक सुरू होती. दहा वाजता सुरू झालेली बैठक बारा वाजता संपली त्यानंतर मंत्री मुळशीकडे गेले.