चारित्र्याच्या संशयावरून मित्राचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चारित्र्याच्या संशयावरून मित्राचा खून
चारित्र्याच्या संशयावरून मित्राचा खून

चारित्र्याच्या संशयावरून मित्राचा खून

sakal_logo
By

हडपसर, ता. २० : पत्नीशी गैरसंबंध असल्याचा समज करून घरा शेजारीच राहणाऱ्या मित्राचा चाकूच्या साह्याने खून करून त्याच्या गुप्तांगाचा भाग कापून टाकला असल्याची घटना घडली आहे. परराज्यात पसार झालेल्या आरोपीला हडपसर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अरुण किसन सूर्यवंशी (वय ५४, रा. मांजरी) असे खून झालेल्या व्यक्तीचे तर, पिताराम केवट (वय २३, रा. मांजरी, मूळ. मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
हडपसर तपास पथकातील सहाय्यक फौजदार सुशील लोणकर, समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ व निखिल पवार यांना आरोपी दिल्ली येथे असल्याचे समजले. तपास पथक दिल्ली येथे गेले असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस नाईक संदीप राठोड यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दिल्ली येथील तपास पथकाला मार्गदर्शन केले. पोलिसांना गुंगारा देऊन दिल्ली येथे लपून बसलेल्या पिताराम केवट याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विश्वास डगळे करीत आहेत.