‘जेई’च्या रुग्णामुळे वडगाव शेरीत अलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जेई’च्या रुग्णामुळे वडगाव शेरीत अलर्ट
‘जेई’च्या रुग्णामुळे वडगाव शेरीत अलर्ट

‘जेई’च्या रुग्णामुळे वडगाव शेरीत अलर्ट

sakal_logo
By

वडगाव शेरी, ता. २ : वडगाव शेरीत ‘जपानी एन्सेफलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण आढळून आल्याने आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलली आहेत. आतापर्यंत वडगाव शेरी येथील आठशे घरांचे सर्वेक्षण केले आहे. महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी परिसरात जेथे रुग्ण आढळला आहे, तेथे त्याच्या संपर्कात आलेल्या इतर २० जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. तसेच संपूर्ण परिसरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत ८०० घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. येथील रुग्णावर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील आरोग्य विभागाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी माजी नगरसेवक योगेश मुळीक, ज्ञानेश्वर शिंदे, आरोग्य विभागाच्या डॉ. रेखा गलांडे, डॉ. विजय बडे, डॉ. धनंजय निल, संदेश रोडे, सचिन लडकत आदी उपस्थित होते.