कात्रज चौकात ज्येष्ठाचा अपघाती मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कात्रज चौकात ज्येष्ठाचा अपघाती मृत्यू
कात्रज चौकात ज्येष्ठाचा अपघाती मृत्यू

कात्रज चौकात ज्येष्ठाचा अपघाती मृत्यू

sakal_logo
By

कात्रज, ता. २ : चौकात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. सिमेंट मिक्सर ट्रकची दुचाकीस धडक बसल्याने ज्ञानदेव गणपतराव डोके (वय ८५, रा. माऊलीनगर कात्रज-कोंढवा रोड) यांचा मृत्यू झाला. डोके दुचाकीवरून जात असताना दुपारी बाराच्या सुमारास सिमेंट-मिक्सर ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात ते जखमी झाले होते. त्यांना भारती विद्यापीठ हॉस्पिटल दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले.