‘गोडवा’तर्फे तीन दिवसीय डेअरी एक्स्पो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘गोडवा’तर्फे तीन दिवसीय डेअरी एक्स्पो
‘गोडवा’तर्फे तीन दिवसीय डेअरी एक्स्पो

‘गोडवा’तर्फे तीन दिवसीय डेअरी एक्स्पो

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त १० ते १२ डिसेंबर रोजी तीन दिवसीय डेअरी एक्सपो २०२२ आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हा एक्स्पो राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स येथे गोडवा इन्स्टिट्यूटच्या पुढाकाराने होत असून त्याचे उद्‍घाटन पुणे जिल्हा दूध संघाच्या (कात्रज डेअरी) अध्यक्षा केशर पवार यांच्या हस्ते होणार आहे. या एक्सपोमध्ये डेअरी टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि कात्रज दूध डेअरी परिवार यांच्या सहभाग असून त्यांच्या माध्यमांतून भारती हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिरही भरविले जाणार आहे.