ज्ञानविकास प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्ञानविकास प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धा
ज्ञानविकास प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धा

ज्ञानविकास प्रतिष्ठानकडून विविध स्पर्धा

sakal_logo
By

कोंढवा, ता. २३ : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञानविकास प्रतिष्ठान आणि क्रिएटिव्ह इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने कबड्डी, खो-खो व डॉजबॉल स्पर्धेचे आयोजन शाळेच्या मैदानावर करण्यात आले. स्पर्धांचे उद्‍घाटन पद्मश्री व अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव यांच्या हस्ते झाले.
या वेळी उदयसिंह मुळीक, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष भगवानराव साळुंखे, वसंतराव कामठे, नानासाहेब मरळ, माऊली कामठे, तानाजी डिंबळे, माणिकराव सातपुते, संदीप बधे, प्रतिष्ठानच्या सचिव कल्पना मुळीक, मानव मुळीक, दिशा मुळीक, मुख्याध्यापिका साधना सालके, प्रशिक्षक सुनील दुर्गाडे उपस्थित होते.