नऱ्हे येथे उड्डाणपूल झाल्यास अपघात टळणार ः शंभूराजे देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नऱ्हे येथे उड्डाणपूल झाल्यास
अपघात टळणार ः शंभूराजे देसाई
नऱ्हे येथे उड्डाणपूल झाल्यास अपघात टळणार ः शंभूराजे देसाई

नऱ्हे येथे उड्डाणपूल झाल्यास अपघात टळणार ः शंभूराजे देसाई

sakal_logo
By

खडकवासला, ता. २७ : ‘‘पश्चिम बाह्यवळण महामार्गावर दरी पूल ते नवले पूल दरम्यान वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर तीव्र उतार कमी करण्यासाठी नऱ्हे परिसरात हा उड्डाणपूल झाल्यास अपघात टळणार असून वाहतूक कोंडी सुटणार आहे. त्यासाठी राज्य सरकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवणार. तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह आम्ही व्यक्तिगत विनंती करणार आहे,’’ अशी माहिती परिवहन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी विधानसभेत दिली.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदार भीमराव तापकीर यांनी नवले पूलदरम्यान वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर लक्षवेधी मांडली होती. त्यास मंत्री शंभूराजे देसाई यांनी उत्तर दिले. महापालिकेच्या ताब्यातील जागेवर सेवा रस्ते तयार करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या जातील, दरीपूल ते सिंहगड रस्त्यापर्यंत डाव्या बाजूचा सेवा रस्ता आहे. उजव्या बाजूस सिंहगड रस्ता ते इंद्रायणी शाळेपर्यंत सेवा रस्ता आहे. नऱ्हे स्मशानभूमीजवळ महामार्गाच्या बाजूने समांतर नाल्यामुळे सेवा रस्ता होऊ शकत नाही. नाल्याच्या बाजूने सुमारे तीन मीटर रुंदीची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जागा आहे. उर्वरित महापालिकेच्या हद्दीतील नियोजित सहा मीटर रुंदीचा रस्ता आहे. दोन्ही मिळून एक मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम महापालिकेमार्फत करण्याचे नियोजित केले आहे. याकामासाठी पथ विभागामार्फत ४.१८ कोटी रुपये रकमेची निविदा मागविली आहे. ती मान्यतेच्या प्रक्रियेत आहे. राष्ट्रीय मार्ग रस्त्यालगत इंद्रायणी इंटरनॅशनल स्कूल ते नऱ्हे स्मशानभूमी दरम्यान नऊ मीटर रुंदीच्या सेवा रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. नऱ्हे स्मशानभूमी ते भूमकर चौक व नवले पूल ते कात्रज दरम्यानच्या भागातील सेवा रस्ते भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत करण्याचे नियोजन असल्याची माहिती मंत्री देसाई यांनी दिली.