कोरेगाव पार्कमधील बॉम्ब हल्ल्यातील मृतात्म्यांना श्रद्धांजली
कोरेगाव पार्कमधील बॉम्ब हल्ल्यातील मृतात्म्यांना श्रद्धांजली

कोरेगाव पार्कमधील बॉम्ब हल्ल्यातील मृतात्म्यांना श्रद्धांजली कोरेगाव पार्कमधील बॉम्ब हल्ल्यातील मृतात्म्यांना श्रद्धांजली

मुंढवा, ता. १३ ः कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत अतिरेक्यांनी १३ फेब्रुवारी २०१० रोजी केलेल्या भ्याड बॉम्ब हल्ल्यात सतरा जणांना प्राण गमवावे लागले होते. येथील श्री छत्रपती राजे प्रतिष्ठान, कोरेगाव पार्क रहिवासी संघ, यूथ फोरम यांच्यासह राजकीय, सामाजिक व विविध संस्थांच्या वतीने मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी त्या काळ्या दिवसाच्या कडू आठवणींना प्रत्यक्षदर्शींनी उजाळा दिला.

याप्रसंगी निवृत्त पोलिस अधिकारी सुहास नाडगौडा, प्रशांत जगताप, उमेश गायकवाड, बाबू
वागस्कर, संगीता तिवारी, श्रीमंत छत्रपती राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड, कोरेगाव पार्कचे पोलिस निरीक्षक
विनायक वेताळ, विजय जगताप, मनोज खरोसे, शंकर खरोसे, रवी कवडे यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.

याप्रसंगी कोरेगाव पार्क रहिवासी संघाने पॉप्युलर हाईटसपासून कॅन्डलमार्च काढला.

बॉम्बस्फोटातील प्रत्यक्षदर्शी संतोष भोसले म्हणाले की, त्या दिवशी सायंकाळी कानठळ्या बसविणारा मोठा आवाज झाला. मी पुढे येऊन पाहिले, तर जर्मन बेकरीकडून लोक सैरावळा पळत होते. धावणाऱ्या लोकांचे चेहरे काळे झाले होते. मी त्वरित अग्निशमन व पोलिसांना फोन केला.

रिक्षाचालक समीर शेख म्हणाले की, प्रवासी भाडे घेण्यासाठी जवळच थांबलो होतो. स्फोट झाल्यावर
विव्हळण्याचा प्रचंड आवाज येत होता. अनेकांना रिक्षात घालून जवळच्या इनलॅक्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.
इनलॅक्स हॉस्पिटलचे डॉ. सुजित सक्सेना यांनी सांगितले की, स्फोट झाल्यावर दवाखान्यात सुमारे
चाळीस जण दाखल झाले होते. अत्यावश्यक रूग्ण तपासून त्यांना त्वरित ऑपरेशन थिएटरमध्ये दाखल करून उपचार सुरू केले. आलेल्यांमध्ये चार जण दगावले, परंतु ३६ जणांना वाचविण्यात यश आले.

मधू तुलसियानी यांनी सांगितले की, स्फोटात माझा मुलगा गमावला आहे. त्याची खूप आठवण येते. तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याला लवकरच नोकरी मिळणार होती, परंतु आमचे सर्वांचेच स्वप्न आता अपूर्ण राहिले.

हबीब शेख म्हणाले की, स्फोटात जखमी व मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी सरकारने पैसे जाहीर केले होते, मात्र ते अद्यापही दिलेले नाही.
---------------------------------
कोरेगाव पार्क ः बॉम्बस्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलेले रहिवासी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com