पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भरतीला स्थगिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भरतीला स्थगिती
पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भरतीला स्थगिती

पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या भरतीला स्थगिती

sakal_logo
By

कँटोन्मेंट, ता. १६ : पुणे कँटोन्मेंट बोर्डाने १६८ विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती, जी गेल्या काही काळापासून रिक्त होती, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या स्पष्ट निर्देशांमुळे बोर्डाने ही पदे भरण्यास सांगितले होते.
मात्र संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या भूविभागाच्या वतीने प्रचलित सरकारी ठराव (जीआर) मध्ये असे म्हटले आहे की, देशातील ५४ कँटोन्मेंट बोर्डांची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत ही प्रक्रिया स्थगित ठेवली जाईल. तथापि, संरक्षण मंत्रालयाने हे देखील स्पष्ट केले की, भरतीला केस टू केस आधारावर परवानगी दिली जाऊ शकते.
या संदर्भात ‘‘पुढील आदेशापर्यंत भरती स्थगित ठेवण्याचे आदेश आम्हाला संरक्षण मंत्रालयाकडून मिळाले आहेत,’’ असे बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल यांनी सांगितले. कँटोन्मेंट बोर्डाला गेल्या अनेक वर्षांपासून मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. ज्याचा परिणाम त्याच्या कामकाजावर आणि एकूणच प्रशासनावर झाला आहे.