Tue, October 3, 2023

उबाळेनगर परिसरात घरफोडी
उबाळेनगर परिसरात घरफोडी
Published on : 24 May 2023, 12:52 pm
वाघोली, ता. २४ ः उबाळे नगर परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. याप्रकरणी सौरभ भोसले यांनी लोणीकंद पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसले हे २० मे रोजी घर बंद करून गावी गेले असता चोरट्यांनी चोरी केली. त्यांनी घरातील ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोकड व अन्य वस्तू लंपास केल्या.