विद्यार्थिनीकडून वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनीकडून वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून
विद्यार्थिनीकडून वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून

विद्यार्थिनीकडून वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून

sakal_logo
By

अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीकडून
वर्गमित्राचा भोसकून खून

आत्महत्येच्या प्रयत्नानंतर बचावली

पुणे/वाघोली, ता. २९ : अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने वर्गमित्राचा चाकूने भोसकून खून करून आत्महत्येचा प्रयत्न केला. वाघोलीतील मुलांच्या खासगी वसतिगृहात शिरकाव करून तिने हे कृत्य केले. सोमवारी पहाटे हा खळबळजनक प्रकार घडला.
प्रेमप्रकरणातून हे घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. हाताची नस कापून घेतलेल्या विद्यार्थिनीला विद्यार्थ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्यामुळे तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अनुजा महेश पन्हाळे (वय २१, मूळ रा. नगर) असे विद्यार्थिनीचे नाव आहे, तर यशवंत अशोक मुंढे (वय २२, मूळ रा. लातूर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हे दोघे रायसोनी महाविद्यालयात संगणकशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षात शिकत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनुजा आणि यशवंत यांच्यात प्रेमसंबंध होते. यशवंत नेहमी तिच्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांची भांडणे व्हायची. यशवंतने तिच्यावर अनेक बंधने घातली होती. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अनुजा मुलांच्या वसतिगृहात अभ्यासासाठी गेली. त्यानंतर मध्यरात्री त्यांचे पुन्हा भांडण झाले. त्यात अनुजाने यशवंतच्या छातीवर व पोटावर चाकूने वार केले. यात यशवंतचा मृत्यू झाला.
अनुजा नंतर इमारतीमधून खाली आली. तिने हाताची नस कापून घेतली. त्याच अवस्थेत ती इमारतीसमोरील खाऊ गल्लीच्या बेंचवर बसून राहिली. तेथून जाणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी तिची अवस्था पाहून १०० क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी अनुजाला खासगी रुग्णालयात दाखल केले.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार पुढील तपास करीत आहेत.
---
माहितीसाठी टाळाटाळ
मुलांचे खासगी वसतिगृह असलेली किंग्स्टन हाऊस ही इमारत स्थानिक व्यक्तीच्या मालकीची आहे. ती दिल्ली येथील डीट्वेलय स्पेसेस या कंपनीने भाडेतत्वावर घेतली आहे. इमारतीच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक तैनात असतात. सुरक्षारक्षक तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ केली.
---
खासगी वसतिगृहांचा सुळसुळाट
पैसा भरपूर मिळत असल्याने खासगी वसतिगृहांचा सुळसुळाट झाला आहे. तिथे सुरक्षिततेबाबत कायम प्रश्नचिन्ह असते. प्रवेशाबाबत कोणतेही बंधन दिसून येत नाही. यावर नियंत्रण हवे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
---

छायाचित्र ओळ – वाघोली : डीट्वेलय स्पेसेस प्रा. लि. या कंपनीच्या किंग्स्टन हाऊस या इमारतीत खुनाची घटना घडली.