विनोदे नगर ते हिंजवडी लक्ष्मी चौकात ‘मेगाब्लॉक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनोदे नगर ते हिंजवडी लक्ष्मी चौकात ‘मेगाब्लॉक’
विनोदे नगर ते हिंजवडी लक्ष्मी चौकात ‘मेगाब्लॉक’

विनोदे नगर ते हिंजवडी लक्ष्मी चौकात ‘मेगाब्लॉक’

sakal_logo
By

वाकड, ता. १४ : दिवसभर पडणारा पाऊस, उखरलेला रस्ता, बंद सिग्नल, विनोदे नगर चौकात असलेल्या ओढ्यावरील काठड्याला पालिकेने घातलेले कुंपण अन् बंद पडलेले वाहन यामुळे बुधवारी (ता. १४) रात्री साडे सातच्या सुमारास विनोदे नगर ते हिंजवडी लक्ष्मी चौकात एक किमीपर्यंत मेगाब्लॉक झाला. सायंकाळी आयटी कंपन्या व इतर कामगार घरी जाण्याची वेळ असल्याने या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असते. ८ सप्टेंबरलाही सायंकाळी सहा ते १० वाजेच्या दरम्यान तबबल चार तास वाहतूक कोंडी झाली होती. अनेक जण रस्त्यात अडकून पडले. काहींनी तर वाहनातून उतरून पायी घर गाठले होते. या वेळी येथे वाहतूक पोलिस तैनात करण्याची मागणी होत आहे. बुधवारी झालेली कोंडी रात्री साडे आठपर्यंत कायम होती.

Web Title: Todays Latest Marathi News Wkd22a00918 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..