घोरपडीमध्ये छट पूजा मोठ्या उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोरपडीमध्ये छट पूजा मोठ्या उत्साहात साजरी
घोरपडीमध्ये छट पूजा मोठ्या उत्साहात साजरी

घोरपडीमध्ये छट पूजा मोठ्या उत्साहात साजरी

sakal_logo
By

घोरपडी, ता. ३० : बी. टी. कवडे रस्ता येथील कालव्यात उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने छटपूजा केली. सूर्याला अर्ध्य देऊन ही पूजा केली जाते. बी. टी. कवडे रस्ता आणि घोरपडी परिसरातील उत्तर भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. घोरपडी, डोबरवाडी, वानवडी, सोपानबाग, पिंगळेवस्ती परिसरातून सुमारे दोन हजार नागरिक आले होते.
यावेळी महिला, पुरुष आणि लहान मुले पारंपारिक वेशभूषा परिधान केला होता. रविवारी दुपारी चार वाजल्यापासून ते सूर्यास्तापर्यंत महिला पाण्यामध्ये उभ्या राहून पती व कुटुंबीयांच्या सुख-शांतीसाठी सूर्याची प्रार्थना केली. तसेच यावेळी छटपूजेचे विविध गाणी म्हणत छट मातेची पूजा केली. सूर्यास्तानंतर घाटावर पूजा करून त्यामध्ये सर्व प्रकारचे फळे आणि भाज्या यांचा नैवेद्य दाखवला. चार दिवस उपवास करून कार्तिक सप्तमीला उद्या सूर्योदयाच्या आधी पूजा करून उपवास सोडला जातो. त्यासाठी सर्वजण सूर्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अखिल मित्र मंडळाच्यावतीने उत्तर भारतीय लोकांच्या सुविधेसाठी कालव्याच्या घाटावर पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. पूजेसाठी नागरिकांना लागणाऱ्या सुविधा पुरवल्या. मोठ्या उत्साहाने स्थानिक नागरिक यामध्ये सहभागी होतात, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष विनोद सिंग यांनी दिली.
यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अखिलेश मिश्रा, स्थानिक नेते किशोर धायरकर, अजय पाटोळे, योगेश घोडके आदी उपस्थित होते.

PNE22T02011