बी. टी. कवडे रस्ता परिसरातून बांधकामासाठीचे स्टील चोरीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बी. टी. कवडे रस्ता परिसरातून 
बांधकामासाठीचे स्टील चोरीला
बी. टी. कवडे रस्ता परिसरातून बांधकामासाठीचे स्टील चोरीला

बी. टी. कवडे रस्ता परिसरातून बांधकामासाठीचे स्टील चोरीला

sakal_logo
By

घोरपडी, ता. ३१ : बी. टी. कवडे रस्त्यावरील अग्निशमन केंद्राशेजारील जागेमध्ये पालिकेकडून दोन मोठ्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांचे काम सुरू आहे, टाक्या बांधण्यासाठी आणलेले तीन लाख किमतीचे ५ टन स्टील चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लार्सन अँड टुब्रो कंपनीचे साइट अभियंता कृष्णदू मराती यांनी या संदर्भात मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनेक दिवसांपासून टाक्यांचे काम बंद असलेल्या या ठिकाणी स्टील, लोखंड मोठ्या प्रमाणावर पडलेले आहे. संरक्षण भिंत नसल्याने रात्रीच्यावेळी स्टील, लोखंड गायब होत असल्याच्या घटना अधूनमधून होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या वेळी मात्र मोठी चोरी झाली असून यामध्ये काही स्थानिकांचा हात असल्याचीही चर्चा परिसरात आहे.

दरम्यान, स्टील २२ डिसेंबरलाच चोरीला गेले आहे, तरी संबंधित कंपनीने लगेच पोलिसांत तक्रार का केली नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या मते येथे मोठ्या प्रमाणावर स्टील होते. कंपनीने फक्त पाच टन चोरीची तक्रार दाखल केली. यामुळे यात काहीतरी गडबड असून, पोलिसांनी याचा लवकरात लवकर शोध घ्यावा. सरकारी मालमत्तेचे चोरी केली असून, नागरिकांच्या कररुपी पैशावर दरोडा टाकला, असे मत स्थानिक नेते विशाल कवडे यांनी व्यक्त केले.

पाच टन स्टीलच्या चोरीची फिर्याद आमच्याकडे आलेली आहे. आम्ही याचा तपास करीत असून, आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. सर्व तपास करून पुढील कारवाई करणार आहोत.
- अजित लकडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे