
राष्ट्रीय व्यापार महापरिषदेचे ७ मे रोजी आयोजन
पुणे, ता. ४ : जीतो पुणेच्या वतीने आयोजित केलेल्या जीतो कनेक्ट २०२२ आंतरराष्ट्रीय परिषद व ट्रेड फेअरमध्ये राष्ट्रीय व्यापार महापरिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ७ मे रोजी ही परिषद होणार आहे. यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत व नॅशनल रेनफेड एरिआ अथॉरिटी भारत सरकारचे सीईओ अशोक दलवाई उपस्थित राहणार आहेत.
जीतो, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर, पुणे व्यापारी महासंघ आणि दि पूना मर्चंट्स चेंबर यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन केले आहे. ही महापरिषद शनिवारी (७ मे) दुपारी ३.३० वाजता होणार आहे, अशी माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया यांनी दिली. यावेळी जीतो अपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, मुख्य सचिव पंकज कर्नावट, जीतो पुणेचे सहसचिव किशोर ओसवाल मान्यवर उपस्थित होते.
पुढील काळात देशाचे व्यापार धोरण कसे असेल हे त्यांच्याकडून समजण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर हे युवा नेते आहेत. देशाच्या राजकारणातील त्यांचे योगदान पाहता केंद्र सरकारची व्यापारासंबंधीची दिशा समजण्यास मदत होणार आहे, असे राजेंद्र बाठिया यांनी सांगितले. यासाठी नावनोंदणी करण्याची आवश्यकता असून जीतो कनेक्ट २०२२ च्या संकेतस्थळावर जाऊन ही नावनोंदणी करता येईल, असे महेंद्र पितळीया यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01790 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..