जयराज ग्रुपच्यावतीने ‘रंग रंगीलो गुजराती’ संगीत कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयराज ग्रुपच्यावतीने ‘रंग रंगीलो गुजराती’ संगीत कार्यक्रम
जयराज ग्रुपच्यावतीने ‘रंग रंगीलो गुजराती’ संगीत कार्यक्रम

जयराज ग्रुपच्यावतीने ‘रंग रंगीलो गुजराती’ संगीत कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : महाराष्ट्र दिन व गुजरात दिनाचे औचित्य साधून दोन्ही राज्यांचा स्थापना दिन साजरा करण्यासाठी पूर्वसंध्येला शनिवारी (ता. ३) जयराज ग्रुपच्यावतीने ‘रंग रंगीलो गुजराती’ हा संगीत रजनीचा कार्यक्रम पार पडला. जयराज ग्रुपचे संचालक राजेश शहा व जयंत शहा यांनी पुण्यातील गुजराती समाजातील बांधवांसाठी शहरात पहिल्यांदाच मुंबई येथील ‘ताणारीरी म्युझिकल ग्रुप’ चा संगीत रजनी कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी गुजराती समाजातील संस्थांचे प्रमुख नितीन भाई देसाई, पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देविचंद जैन, राजकुमार चोरडीया, नैनेश नंदू, दिलीप परमार, विनोद शहा, हेमंत मणियार, प्रमोद शहा, धिरेन नंदू, राजेंद्र बांठीया, प्रवीण चोरबोले, धवल शहा, मालव शहा,
आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची संकल्पना भावेश दवे यांची होती. तर प्रियांका जैन, हिम्मत कुमार, गीतांजली जेढे व रुपल शहा हे गायक होते. प्रवीण व्यास यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01791 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top