उद्योगापासून भविष्याचा वेध एकाच व्यासपीठावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उद्योगापासून भविष्याचा वेध एकाच व्यासपीठावर
उद्योगापासून भविष्याचा वेध एकाच व्यासपीठावर

उद्योगापासून भविष्याचा वेध एकाच व्यासपीठावर

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : जीतो कनेक्ट २०२२ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून शिक्षणापासून विविध प्रकारच्या उद्योगांचा मिलाफ येथे झाला आहे. ट्रेड फेअर आयोजित करण्यात आले आहे. व्यवसाय ते व्यवसाय (बी टू बी), गृह, ऑटोमोबाईल, ऊर्जा, उच्च माध्यमिक, अभियांत्रिकी, रोबोटिक्स, अंतराळशास्त्र, बँकिंग, विमा, बिझनेस मॅनेजमेंट अशा विविध विषयांवर प्रकाश टाकणारे आणि ज्ञानात भर घालणारे स्टॉल्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांनी या विभागाला भेट देत विविध उद्योग संधी आणि नव्या शैक्षणिक संधीची माहिती घेतली.
अंतराळ आणि अवकाशशास्त्र अभ्यासक्रम, स्पेस सायन्स लॅबची उभारणी करून देणारे सेंटर फॉर स्टेम अँड स्पेस सायन्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. इंजिनिअरिंग, रोबोटिक्स ते कथा लेखन, प्रॉडक्ट डिझायनिंग हे अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांचे स्टॉल्सही दिमाखात उभे आहेत. जागतिक दर्जाचे वातावरण देणाऱ्या आधुनिक शाळाही सोबतीला आहेत. याच बरोबर उद्योजकता, वस्त्रप्रावरणे आणि ग्लोबल फॅमिली बिझनेस व्यवस्थापनाच्या मार्गदर्शन करणाऱ्या संस्थाही आपल्या उद्योग वाढीस हातभार लावण्यास सज्ज आहेत.
लिथियम आयर्नवर चालणाऱ्या लहान बॅटरी आणि आपल्या उद्योगस्थळी मागणीनुसार डिझेल पुरविणारे वाहनही उद्योजकांना भुरळ घालत आहेत. द्विमितीय आणि त्रिमितीय दृष्यमानता देणारे शिट्स आणि कलाकृती आपल्या उद्योगस्थळाच्या सौंदर्यात भर घालताना दिसत आहेत. तर रुग्णास पंचतारांकित अनुभव देणाऱ्या सिग्नेचर सूट हॉस्पिटलचा चेहरामोहरा बदलणार आहेत. रोबोटिक्स सर्जरी जटिल शस्त्रक्रिया सोप्या करून देणार आहेत. डेअरी, मसाले आणि तृणधान्याचे पीठ करणारे आधुनिक यंत्र, जलरोधक औद्योगिक छत प्रणाली (रुफटॉप), दुग्ध उत्पादने, आलिशान गृह प्रकल्प याचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01798 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top