व्यवसाय वृद्धीसाठी नवीन कौशल्ये आत्मसात करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यवसाय वृद्धीसाठी नवीन कौशल्ये आत्मसात करा
व्यवसाय वृद्धीसाठी नवीन कौशल्ये आत्मसात करा

व्यवसाय वृद्धीसाठी नवीन कौशल्ये आत्मसात करा

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : "व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी केवळ पैसा लागत नाही. तर स्वत:ला झोकून देण्याची वृत्ती असावी लागते. यासाठी नवीन कौशल्ये आत्मसात करणे, सर्वच कामे स्वत: न करता कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेण्याची कला अवगत होणे आवश्यक आहे. व्यवसाय आपल्या शिवाय देखील वृद्धी कसा करेल याचा विचार केला तरच व्यवसायवाढीसाठी पूरक वातावरण तयार होते, असे मत बिझनेस कोच राहुल जैन यांनी जीतो कनेक्ट २०२२ परिषदेअंतर्गत डबल युवर प्रॉफिट परिसंवादात व्यक्त केले.

व्यवसाय वाढीसाठी अनेक वर्षाचे उदिष्ट ठेवा, सर्वच गोष्टी मनात न ठेवता त्या कागदावर लिहून काढा. त्याचे अनुसरण करा. तसेच सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा नवनवीन गोष्टी शिका. सध्या व्यावसायिकांना डिस्काउंट, क्रेडिट, स्पर्धा, मार्केटमधील मंदी या समस्या जाणवतात. मात्र, या समस्या नाही तर उद्योगवाढीसाठी विचार करण्यासाठी वेळ आहे. वेळ न मिळणे ही समस्या आहे. विक्री एक ही समस्या नाही तर ते ज्ञान आहे. नवीन ग्राहकांशी नेहमी संपर्कात राहणे, कर्मचाऱ्यांशी वैयक्तिक चर्चा करणे, आपल्या परिवाराला वेळ देणे यादेखील बाबी महत्त्वपूर्ण असतात, असा सल्लाही यावेळी राहुल जैन यांनी उपस्थित व्यावसायिकांना दिला.

एखाद्या व्यवसायाचा मालक सुरुवातीला सर्वच कामे स्वत: करतो. त्यामुळे त्याच्या व्यवसायाची वाढ होते पण नंतर कामगार ठेवले की अचानक गती मंद होते. त्यामुळे कामगारांकडून काम करून घेण्याची कला देखील आत्मसात करणे गरजेचे आहे. तसेच व्यवसायामधील तज्ज्ञांचे मार्गदर्शन देखील घेतले तर स्वत:वरचा ताण कमी होईल व व्यवसायवृद्धीसाठी वेळ देता येईल.
- राहुल जैन, बिझनेस कोच

YAR22B02815

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01803 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top