घेवडा, बटाटा, मटार महागला मार्केट यार्ड ः मागणी कमी असल्याने लसणाच्या भावात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घेवडा, बटाटा, मटार महागला

मार्केट यार्ड ः मागणी कमी असल्याने लसणाच्या भावात घट
घेवडा, बटाटा, मटार महागला मार्केट यार्ड ः मागणी कमी असल्याने लसणाच्या भावात घट

घेवडा, बटाटा, मटार महागला मार्केट यार्ड ः मागणी कमी असल्याने लसणाच्या भावात घट

sakal_logo
By

मंडई

मार्केट यार्ड, ता. २२ : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये गेल्या आठवड्या इतकीच रविवारी फळभाज्यांची आवक झाली. आवकच्या तुलनेत मागणी वाढल्याने कांदा, ढोबळी मिरची, घेवडा, बटाटा व मटारच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, मागणी कमी असल्याने लसणाच्या भावात घट झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

रविवारी तरकारी विभागात ९० ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. टोमॅटोला सातत्याने मिळणाऱ्या कमी दरामुळे शेतकऱ्यांनी काढलेली पिके त्यात पाण्याअभावी नवीन लागवडी न झाल्याने टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, मार्केट यार्डात टोमॅटोची घटलेली आवक कायम आहे. परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेश येथून १ ट्रक मटार, आंध्रप्रदेश व तमिळनाडू येथून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून ८ ते १० टेम्पो तोतापुरी कैरी व ३ टेम्पो घेवडा तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची १४ ते १५ ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० ते ९०० पोती, टोमॅटो ५ हजार ते ६ हजार क्रेटस, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, ढोबळी मिरची ८ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, भेंडी ५ ते ६ टेम्पो, भुईमूग ५० ते ६० गोणी, गाजर ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ५० ते ६० ट्रक यांसह आग्रा, इंदूर आणि आग्रा व स्थानिक भागांतून बटाटा ४० ते ४५ ट्रक इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव ः कांदा : ९०-१३०, बटाटा : १५०-२००, लसूण :१००-४००, आले सातारी : १००-१७०, भेंडी : २००-३००, गवार : गावरान व सुरती ३००-४००, टोमॅटो : ४००-६००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-५००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२५०, पापडी : ३५०-४००, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : ८०-१२०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : २००-२२०, शेवगा : ३५०-४००, गाजर : २००-२५०, वालवर : ३५०-४००, बीट : १००-१२०, घेवडा : ८००-१०००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : २३५-४००, मटार : ९००-१०००, पावटा : ६००-६५०, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी तोतापुरी : १८०-२२०, गावरान कैरी : १००-२००, चिंच : अखंड : ३००-३५०, फोडलेली : ५५०-६००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

कोथिंबीर, मेथी, शेपू स्वस्त
पालेभाज्या ः कोथिंबीर, मेथी, शेपू जुडीमागे दोन ते पाच रुपयांनी स्वस्त. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची १ लाख ५० हजार जुडी व मेथीची ४० हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक २५ हजार जुड्यांनी तर मेथीची आवक १० हजार जुड्यांनी घटली. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या मागणी टिकून असल्याने बहुतांश पालेभाज्यांचे भाव टिकून होते. उष्णतेमुळे पाण्याचा तुटवडा होऊन दर्जात घसरण झाल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, चुका, पालक व चाकवत भावात जुडी दोन ते पाच रुपयांनी घसरण झाली. तर, चाकवत व कांदापातीच्या भावात जुडीमागे दोन ते पाच रुपयांनी वाढ झाली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव १ ते १५ रुपये तर किरकोळ बाजारात १० ते २० रुपये इतके राहिले असल्याचे व्यापारी अमोल घुले यांनी सांगितले.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-१५००, मेथी : १०००-१२००, शेपू : ८००-१०००, कांदापात : ६००-१०००, चाकवत : ४००-६००, करडई : ४००-७००, पुदिना : ३००-५००, अंबाडी :४००-६००, मुळे : ६००-१०००, राजगिरा : ४००-६००,
चुका : ८००-१०००, चवळई : ५००-७००, पालक : ७००-१२००.

मोगऱ्याच्या फुलांना मागणी कायम
फुलबाजार मार्केट यार्ड : सजावटीसाठी शोभिवंत फुलांसह मोगऱ्याच्या फुलांना मागणी कायम आहे. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत मागणी टिकून असल्याने सर्व फुलांचे गेल्या आठवड्यातील दर स्थिर आहेत. दरम्यान, वाढलेल्या उष्णतेचा फटका फुलांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. उष्णतेमुळे फुलांच्या प्रतवारीवर परिणाम होत असून अन्य फुलांच्या तुलनेत या फुलांना कमी दर मिळत असल्याचे फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-५०, गुलछडी : ४०-६०, अ‍ॅष्टर : जुडी ३०-५०, सुट्टा १५०-२००, कापरी : ३०-६०, शेवंती : १५०-२००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ७०-१५०, डच गुलाब (२० नग) : ६०-२००, जर्बेरा : ५०-८०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) १५००-१८००, ऑर्चिड ५००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१५०, मोगरा ५००-७००.

बाजारात अन्य फळांच्या मागणीत घट
फळबाजार मार्केट यार्ड : नागरिकांनी आंब्याच्या खरेदीकडे आपला मोर्चा वळविल्याने बाजारात अन्य फळांच्या मागणीत घट झाली आहे. अडकन बहरातील संत्री बाजारात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम फळांच्या प्रतवारीवर झाला आहे. बाजारात जवळपास निम्म्याहून अधिक फळांमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असल्याने प्रतवारी ढासळली आहे. बाजारात लिंबाची आवक वाढली असून त्यामध्ये कच्चा व हिरव्या लिंबाचे प्रमाण जास्त असल्याने भावात १५ किलोच्या गोणीमागे दोनशे रुपयांनी घट झाली आहे. अन्य सर्व फळांची आवक जावक कायम असून दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत कायम आहेत अशी माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

रविवारी (ता. २२) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस ६ ट्रक, संत्री १ ते २ टन, मोसंबी ३० ते ४० टन, डाळिंब ३० ते ३२ टन, पपई १० ते १५ टेम्पो, लिंबे सुमारे १५०० ते २००० गोणी, पेरू ५० ते १०० के्रटस्, कलिंगड ४० ते ५० गाड्या, खरबूज १५ ते २० गाड्या, अंजीर १ टन तर रत्नागिरी हापूस पाच ते सहा हजार पेटी आवक झाली. फळांचे भाव पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रति गोणी) : ५००-१०००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४००, (४ डझन) : १०० ते २४०, संत्रा : (१० किलो) : ५००-७५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१५०, गणेश : १०-४०, आरक्ता २०-८०. कलिंगड : ३-७, खरबूज : १०-१२, पपई : ७-१२, पेरू (२० किलो) : १००-२००, चिक्कू (१० किलो) : १००-४००, अंजीर : ३०-१३०, रत्नागिरी हापूस (३ ते ८ डझन) (कच्चा) : ८००-१५००, (तयार) : १२०० ते २०००. कर्नाटक आंबा : हापूस (४ ते ५ डझन) ८००-१५००, पायरी (४ ते ५ डझन) ४००-७००, लालबाग (१ किलो) २०-४०, बदाम (१ किलो) : २५-४०.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01822 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top