कोबी, बटाट्याचे भाव वाढले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोबी, बटाट्याचे भाव वाढले!
कोबी, बटाट्याचे भाव वाढले!

कोबी, बटाट्याचे भाव वाढले!

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. २९ : मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने कोबी व बटाट्याच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली.

रविवारी तरकारी विभागात ९० ट्रकमधून शेतमालाची आवक झाली. स्थानिक भागासह परराज्यातून बाजारात कोबीची आवक होते. स्थानिक परिसरातून कोबीची अपेक्षित आवक होत नाही. त्यात परराज्यातून होणाऱ्या आवकेत मोठी घट झाल्याने कोबीच्या भावात वाढ झाली, तर शीतगृहातून कमी प्रमाणात बटाटा बाजारात आल्याने भाव वाढल्याचे सांगण्यात आले.

टोमॅटोला सातत्याने मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकऱ्यांनी काढलेली पिके, त्यात पाण्याअभावी नवीन लागवड न झाल्याने टोमॅटोच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, मार्केट यार्डात टोमॅटोची घटलेली आवक कायम आहे. कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी कांदा साठवणूकीस प्राधान्य दिले आहे. यामुळे गत आठवड्याच्या तुलनेत कांद्याची आवक टिकून असल्याचे सांगण्यात आले.

परराज्यांतून आलेल्या शेतमालामध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून सुमारे १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, हिमाचल प्रदेश येथून दोन ट्रक मटार, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथून चार ते पाच टेम्पो शेवगा, कर्नाटकातून पाच ते सहा टेम्पो तोतापुरी कैरी व दोन टेम्पो घेवडा तर गुजरात, मध्य प्रदेशातून लसणाची १४ ते १५ ट्रक इतकी आवक झाली.

स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० ते ९०० पोती, टोमॅटो सहा हजार ते सहा हजार ५०० क्रेट, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी पाच ते सहा टेम्पो, ढोबळी मिरची आठ ते १० टेम्पो, गवार पाच ते सहा टेम्पो, भेंडी सात ते आठ टेम्पो, भुईमूग ५० ते ६० गोणी, गाजर पाच ते सहा टेम्पो, तांबडा भोपळा आठ ते १० टेम्पो, कांदा ६० ट्रक यांसह आग्रा, इंदूर आणि स्थानिक भागांतून बटाट्याची ३५ ट्रक इतकी आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : ८०-१३५, बटाटा : १७०-२१०, लसूण :१००-४००, आले सातारी : १००-२००, भेंडी : २००-३००, गवार : गावरान व सुरती २५०-४००, टोमॅटो : ४५०-५५०, दोडका : ४००-४५०, हिरवी मिरची : २००-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २००-२५०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी २५०-३००, पांढरी : २००-२५०, पापडी : ४००-४५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : १००-१४०, वांगी : २००-३००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १८०-२००, शेवगा : ४००-५००, गाजर : २५०-२८०, वालवर : ३५०-४००, बीट :१२०-१४०, घेवडा : ९००-१०००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार : ९००-१२००, पावटा : ६००-६५०, तांबडा भोपळा : ६०-१००, कैरी तोतापुरी : १५०-२००, चिंच : अखंड : ३५०, फोडलेली : ६००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या ः अतिउष्णतेमुळे पाण्याचा निर्माण झालेला तुटवडा, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या तडाख्याने कोथिंबीर, मेथीसह अन्य पालेभाज्यांच्या उत्पादनासह दर्जावर परिणाम झाला आहे. बाजारात पालेभाज्यांची आवक घटली असून दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. त्यातुलनेत मागणी जास्त असल्याने पालेभाज्यांच्या जुडीचे भाव तीस ते चाळीस रुपयांवर पोहोचले आहेत. रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची एक लाख ५० हजार जुडी व मेथीची ५० हजार जुडी आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथिंबिरीची आवक स्थिर राहीली, तर मेथीची आवक १० हजार जुड्यांनी वाढली. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव ४ ते २५ रुपये, तर किरकोळ बाजारात १५ ते ३० रुपये इतके राहिले.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००-२५००, मेथी : ८००-१२००, शेपू : ८००-१२००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ५००-७००, करडई : ५००-६००, पुदिना : २००-५००, अंबाडी : ४००-६००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-६००, पालक : ८००-१२००.

फळबाजार ः
फळबाजारात रविवारी (ता. २९) लिंबाची सुमारे एक हजार गोणी आवक झाली होती. आवकेमध्ये हिरव्या लिंबाचे प्रमाण जास्त होते, तर डाळिंब सुमारे ३० टन, मोसंबी ३ टेम्पो, संत्रा अवघा ३ टन, पपई १० टेम्पो, चिक्कू ५ हजार गोणी, कलिंगड ३०, तर खरबूज सुमारे ५ टेम्पो, कोकणातील आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात असून तयार आंब्याच्या सुमारे ३ हजार पेट्या उपलब्ध होत्या, तर कर्नाटकातून सुमारे ५ हजार बॉक्स आणि पेट्यांची आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ४००-६००, मोसंबी : (३ ते ४ डझन) : २००-७००, संत्रा : (१० किलो) : ३००-७००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : २५-१५०, गणेश : १०-३०, आरक्ता १०-६०. कलिंगड : १०-२०, खरबूज : २०-२२ , पपई : ५-१०, चिक्कू (१० किलो) १००-४००, रत्नागिरी हापूस ३ ते ८ डझन : १५००-२५००, कर्नाटक हापूस ४-५ डझन - ८००-१५००, (२ डझन पेटी) - ३००-४००, क्रेटमधील प्रति किलो - ५०-७० रुपये, पायरी ४ डझन पेटी - ६००-८००, क्रेटमधील प्रति किलो ३०-६०, लालबाग ३०-५०, बदाम आणि बैंगणपल्ली प्रति किलो - ३०-४० रुपये.

गावरान आंब्याच्या हंगामाची प्रतीक्षा...
कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुणे जिल्ह्याच्या पश्‍चिम घाट परिसरातील मावळ, मुळशी भोर, वेल्हा तालुक्यातून रायवळ आणि हापूस आंब्याची आवक सुरू होते. मात्र, अद्याप हंगाम जोमात सुरू झाला नसून, रविवारी केवळ २० क्रेटची आवक झाली होती. एका डझनला १०० ते १२० रुपये दर होता.

शोभिवंत फुलांसह मोगऱ्याच्या मागणीत घट...
लग्नतिथी संपल्याने शोभिवंत फुलांसह मोगऱ्याच्या फुलांच्या मागणीत घट झाली आहे. परिणामी, गत आठवड्याच्या तुलनेत त्यांच्या भावात पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. मार्केट यार्डातील फूलबाजारात सर्व प्रकारच्या फुलांची आवक साधारण आहे. आवक-जावक कायम असल्याने सर्व प्रकारच्या फुलांचे दर स्थिर आहेत.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-५०, गुलछडी : ३०-५०, अ‍ॅष्टर : जुडी ३०-४०, सुट्टा १००-२००, कापरी : ५०-१००, शेवंती : ८०-१५०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२०, गुलछडी काडी : ५०-१२०, डच गुलाब (२० नग) : ५०-१५०, जर्बेरा : ४०-६०, कार्नेशियन : १००-१५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) १०००-१३००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, मोगरा ३००-५००.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01830 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top