‘बिगर शेतसारा आकारणीबाबत फेरविचार करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘बिगर शेतसारा आकारणीबाबत फेरविचार करा’
‘बिगर शेतसारा आकारणीबाबत फेरविचार करा’

‘बिगर शेतसारा आकारणीबाबत फेरविचार करा’

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : कृषी उत्पन्न बाजार समितीने मागील ११ वर्षांच्या बिगर शेतसारा फरकाच्या रकमांचा भरणा करण्याच्या सूचना भुसार विभागातील व्यापाऱ्यांना केल्या आहेत. मात्र, या वाढीव कराचा व्यापाऱ्यांवर भार पडणार आहे. त्यामुळे या वाढीव कराचा फेरविचार करावा, असे निवेदन दि पुना मर्चंटस्तर्फे सहकार मंत्र्यांना देण्यात आले आहे.

दि पुना मर्चटस्चे अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘मागील पूर्वलक्षी प्रभावाने केलेल्या अकृषिक कराची आकारणी अवाजवी व अयोग्य आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही कृषी उत्पन्नाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी स्थापन केलेली व्यवस्था आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतीमालासंबंधी दैनंदिन व्यवहार होतात. येथील आस्थापनावर अकृषिक कराची आकारणी होऊ नये, अशी आमची मागणी आहे.
महाराष्ट्र शासनाने अकृषिक कराच्या फेररचनेसाठी अकृषिक कराच्यासंदर्भातील अंमलबजावणीत सूसुत्रता आणण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ही समिती अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे. या वाढीव करावर फेरविचार करण्यासाठी अप्पर मुख्य सचिव, महसूल विभाग यांना संघटनेतर्फे पत्र पाठविले आहे. तसेच शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व पणन संचालक सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती राजेंद्र बाठिया यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01866 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top