पुण्यात १०० ट्रक फळभाज्यांची आवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune market yard Arrival of 100 trucks of fruits and vegetables
पुण्यात १०० ट्रक फळभाज्यांची आवक

पुण्यात १०० ट्रक फळभाज्यांची आवक

मार्केट यार्ड : मागील आठवड्याच्या तुलनेत रविवारी फळभाज्यांची आवक वाढली. आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत टोमॅटो, घेवडा, कोबी, शिमला, शेवग्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी घट झाली. पावसामुळे सातारी आल्याची काढणी रखडल्याने बाजारातील घटलेली आवक कायम आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांची आवक-जावक कायम असल्याने दर स्थिर राहिले.

गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता. ३) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशमधून हिरव्या मिरचीची १० ते १२ ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून ४ ते ५ टेंपो शेवगा, कर्नाटकमधून ३ टेंपो घेवडा, इंदूरहून ७ टेंपो गाजर, हिमाचल प्रदेशमधून ३० गोणी मटार आणि कर्नाटकमधून २ टेंपो तोतापुरी कैरी, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची ८ ते १० ट्रक इतकी आवक झाली. तर राज्याच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची ५०० पोती, भेंडीची ५ ते ७ टेंपो, गवारची ७ टेंपो, टोमॅटोची १२ ते १३ हजार कॅरेट, फ्लॉवरची १२ टेंपो, कोबीची ७ ते ८ टेंपो, सिमला मिरचीची १५ टेंपो, भुईमूग शेंगाची ७० ते ८० पोती, तांबडा भोपळा १० टेंपो, कांद्याची ८० ट्रक, बटाटा आंध्र प्रदेश आणि इंदूर येथून ३० ट्रक बटाटा इतकी आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्ड येथील ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १००-१६०, बटाटा : १७०-२१०, लसूण : १५०-४००, आले सातारी : १५०- ३००, भेंडी : २००-४००, गवार : गावरान व सुरती २५०- ४००, टोमॅटो : १००-२००, दोडका : ३००-३५०, हिरवी मिरची : ३००-४५०, दुधी भोपळा : १५०-२००, चवळी : २००-३००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी २२०- २५०, पांढरी : १८०-२००, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, काकडी : १००-१४०, फ्लॉवर : १००-१४०, कोबी : १२०-२५०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ३००-३५०, गाजर : ३००-३५०, वालवर : ३५०-४००, बीट : १८०- २००, घेवडा : ७००-८००, कोहळा : १००-१५०, आर्वी :२००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ३५०-४००, मटार : परराज्य : १०००-११००, पावटा : ५००-६००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-८०, कैरी : तोतापुरी : ४००, गावरान : १५०-२५०, चिंच : अखंड ३५०, फोडलेली : ६५०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

सर्वच पालेभाज्या भावात वाढ
मागील आठवड्याच्या तुलनेत कोंथिंबीर व मेथीची आवक स्थिर राहिली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे ४ ते ५ रुपये, कांदापात ३, पुदिना १, मुळे १२, मेथी, अंबाडी, राजगिरा, चाकवतच्या भावात प्रत्येकी २ रुपयांनी वाढ झाली आहे. रविवारी घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या प्रतिजुडीचे भाव ४ ते २२ रुपये तर किरकोळ बाजारात १५ ते ३० रुपये इतके राहिले. तरकारी विभागात कोथिंबिरीची १ लाख ५० हजार जुडी व मेथीची ४० हजार जुडी आवक झाली. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००- २२००, मेथी : ८००-१५००, शेपू : १०००-१२००, कांदापात : १२००-१६००, चाकवत : ६००-१०००, करडई : ६००- ८००, पुदीना : ३००-५००, अंबाडी : ४००-६००, मुळे : १५००-३०००, राजगिरा : ६००-१०००, चुका : १०००- १२००, चवळई : ६००-८००, पालक : १०००-१५००.

सीताफळ आणि पपईच्या भावात वाढ
पावसाने ओढ दिल्याचा परिणाम डाळिंब, सीताफळ, पपई आदी फळांवर झाला आहे. पाण्याअभावी या फळांच्या दर्जात घसरण झाली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या तुलनेत मागणी कमी झाल्याने डाळिंब, कलिंगडाच्या भावात दहा टक्क्यांनी तर लिंबूच्या भावात १५ किलोंच्या गोणीमागे १०० रुपयांनी घसरण झाली आहे. मागणी वाढल्याने पपई व सीताफळाच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्य सर्व फळांची आवक जावक कायम असल्याने त्यांचे दर गत आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत. रविवारी (ता. ३) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस ४ ट्रक, संत्री १ टन, मोसंबी २५ ते ३० टन, डाळिंब ४० ते ५० टन, पपई ७ ते ८ टेम्पो, लिंबे सुमारे दोन ते अडीच हजार गोणी, पेरू ३०० ते ३५० क्रेट्स, कलिंगड २ ते ३ गाड्या, खरबूज २ ते ३ गाड्या व सीताफळाची ४ ते ५ टन इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे - लिंबे (प्रति गोणी) : १५०-४००, मोसंबी : (३ ते ४ डझन) : १५०-३५०, संत्री : (१० किलो) : ६००-१०००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३०-१२०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-८, खरबूज : १५-२२, पपई : ८-१७, पेरू (२० किलो) : २५०-४००, चिक्कू (१० किलो) : १००-८००, सीताफळ : २० ते १५०.

फुलांच्या भावात घट
पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ होऊन गुलछडीच्या फुलांनी वाढलेली आवक व घसरलेले दर कायम आहेत. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावल्याने फुलांच्या दर्जात घसरण झाली असून भिजलेल्या फुलांचे प्रमाण वीस टक्क्यांवर आले आहे. आषाढ सुरू झाल्याने बाजारात फुलांना अपेक्षित मागणी नाही. बाजारात दाखल होत असलेल्या ओल्या फुलांच्या तुलनेत सुक्या फुलांना मागणी चांगली आहे.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : ८-२०, ॲॅष्टर : जुडी २०-३०, सुट्टा १००-१३०, कापरी : १०-३०, शेवंती : ४०-८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-२५, गुलछडी काडी : १०-३०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जबेर्रा : २०-३०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी ८०-१२०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१२०, मोगरा २००-३००.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01877 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..