टोमॅटो, कोबी, घेवडा, मटार, पावट्याच्या भावात घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोमॅटो, कोबी, घेवडा, मटार, पावट्याच्या भावात घट
टोमॅटो, कोबी, घेवडा, मटार, पावट्याच्या भावात घट

टोमॅटो, कोबी, घेवडा, मटार, पावट्याच्या भावात घट

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. १७ : तरकारी बाजारात रविवारी मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर आहे. तुलनेने मागणी कमी असल्याने टोमॅटो, कोबी, घेवडा, मटार, पावटा यांच्या भावात घट झाली आहे तर भेंडी, गवार आणि फ्लॉवरच्या भावात वाढ झाली असून उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

मार्केट यार्डमध्ये रविवारी राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशमधून हिरव्या मिरचीची १२ ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून चार टेम्पो शेवगा, कर्नाटकमधून तीन टेम्पो घेवडा, इंदूरहून आठ टेम्पो गाजर, बेळगाव आणि धारवाडमधून तीन टेम्पो मटार, मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली.

राज्याच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आल्याची ९०० पोती, भेंडीची सहा टेम्पो, गवारची सहा टेम्पो, टोमॅटोची १४ हजार कॅरेट, फ्लॉवर, कोबी व सिमला मिरचीची प्रत्येकी १० टेम्पो, भुईमूग शेंगाची १०० पोती, तांबडा भोपळा १० टेम्पो, कांद्याची १२५ ट्रक, आंध्रप्रदेश आणि इंदूर येथून ३२ ट्रक बटाट्याची आवक झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १२०-१६०, बटाटा : १९०-२२०, लसूण : १००-४५०, आले सातारी : २००-४००, भेंडी : ४००-६५०, गवार : गावरान व सुरती ४००-७००, टोमॅटो : १००-१६०, दोडका : ४००-४५०, हिरवी मिरची : २००-३५०, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : ३००-४००, काकडी : १००-१५०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : २००-२५०, काकडी : १००-१५०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १००-१५०, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : ८०-१००, ढोबळी मिरची : ३००-४००, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : २००-२५०, शेवगा : ३५०-४००, गाजर : ३००-३५०, वालवर : ३००-३५०, बीट : १५०-१८०, घेवडा : ६००-७००, कोहळा : १००-१५०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : १५०-२००, ढेमसे : २००-२५०, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : परराज्य : ५००-८००, पावटा : ३००-४००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-८०, चिंच : अखंड ३५०, फोडलेली : ६००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.
नारळ दर - नवा : ११०० ते १३५०, पालकोल : १३५० ते १५००, सापसोल : १६०० ते २३००, मद्रास : २४०० ते २६००

पालेभाज्यांच्या भावात घसरण
आवक वाढल्याने बहुतांश पालेभाज्यांच्या भावात घसरण झाली. घाऊक बाजारात कोथिंबिरीच्या भावात जुडीमागे तब्बल १३ रुपये तर मुळ्याच्या भावात १४ रुपये, तसेच कांदापात आठ रुपये, शेपू सहा

रुपये, पालक आणि मेथी पाच रुपये, पुदीना चार रुपये, चाकवत, करडई, चुका आणि चवळईच्या भावात प्रत्येकी दोन रुपयांनी घट झाल्याची माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली. कोथिंबिरीची पावणेदोन लाख जुडी तर मेथीची ५० हजार जुडींची आवक झाली आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ५००-१२००, मेथी : ४००-१०००, शेपू : ३००-६००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ५००-६००, करडई : ४००-६००, पुदीना : ५००-६००, अंबाडी : ४००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ५००-६००, चुका : ८००-१०००, चवळई : ४००-६००, पालक : ८००-१०००.

चिक्कू, संत्रा, पपईच्या भावात वाढ
मार्केटयार्डातील फळबाजारात चिक्कू, संत्रा आणि पपईच्या भावात वाढ झाली असून कलिंगड, डाळिंब आणि लिंबाच्या भावात घट झाली तर खरबूज, अननस, सीताफळ, पेरू आणि मोसंबीचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
लिंबू दोन ते अडीच हजार गोणी, डाळिंब ४५ टन, मोसंबी ४० टन, संत्रा अवघा दीड टन, पपई १० टेम्पो, कलिंगड चार टेम्पो, खरबूज दोन टेम्पो, अननस चार ट्रक, पेरू ३०० क्रेट आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : २००-५००, संत्रा : (१० किलो) : ४५०-८००, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ३५-१२०, गणेश : ५-३०, आरक्ता १०-५०. कलिंगड : ७- १०, खरबूज : १५-२०, पपई : ५-२२, अननस (एक डझन) ७०-२७०, पेरू (२० किलो) २००-५००.

फुलांची आवक वाढली
मार्केटयार्डातील फूलबाजारात फुलांची आवक वाढली असून बहुतांश फुलांच्या भावात निम्म्याने घसरण झाली. आवकेतील मालापैकी जवळपास ८० टक्के ओल्या मालाचे प्रमाण आहे. सुका माल तुरळक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहे. दरम्यान सुक्या मालाला चांगले भाव मिळत आहेत.

फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-२०, गुलछडी : ३०-५०, आॅष्टर : जुडी २०-४०, सुट्टा १००-१२०, कापरी : १०-३०, शेवंती : ३०-६०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-३०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी ः ८०-१५०, लिलियम (१० काड्या) ः ८००-१०००, आॅर्चिड ४००-५००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१००, मोगरा ः ३००-४००.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01902 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..