
जीतो लेडीज विंग पुणे तर्फे ग्रुप भक्ती संगीत स्पर्धेचे आयोजन
पुणे, ता.१८ : जीतो लेडीज विंग पुणेतर्फे जैन समाजासाठी ‘ग्रुप भक्ती संगीत’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ३० जुलै रोजी सॅलिसबरी पार्क येथील महावीर प्रतिष्ठान येथे होईल. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विजेत्यास ५१ हजार रुपये, द्वितीय ३१ हजार तर तृतीय येणाऱ्यास ११ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी नियम व अटी असून स्पर्धेत १८ वर्षांपुढील महिला व पुरुष सहभागी होऊ शकतात. एका गटात कमीत कमी ५ तर, जास्तीत जास्त १५ स्पर्धक सहभागी होऊ शकतात. स्पर्धेसाठी नोंदणी आवश्यक असून नोंदणीसाठी २१ जुलै अंतिम तारीख आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी स्वतःचा म्युझिकल सेटअप स्वतः लावणे बंधनकारक आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी ९८९०४७२७७२ या क्रमांकावर संपर्क करावे, असे आवाहन जीतो लेडीज विंग पुणेच्या अध्यक्षा खुशाली चोरडिया यांनी केले आहे.
मॉन्सून फेस्टिव्ह धमाका
जीतो पुणे लेडीज विंग तर्फे रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर २३ व २४ जुलै रोजी मॉन्सून फेस्टिव्ह धमाकाचे आयोजन करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन महावीर प्रतिष्ठान सॅलिसबरी पार्क पुणे येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भरणार आहे. त्यामध्ये भेटवस्तू, कपडे, खाद्य पदार्थ, दागिने इत्यादी स्टॉल्सचा समावेश असेल. यामध्ये लकी ड्रॉचे आयोजन केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01906 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..