जीवनावश्यक वस्तूंच्या दरांत वाढ खाद्यपदार्थांवरील जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जीवनावश्यक वस्तूंच्या दरांत वाढ
खाद्यपदार्थांवरील जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष
जीवनावश्यक वस्तूंच्या दरांत वाढ खाद्यपदार्थांवरील जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष

जीवनावश्यक वस्तूंच्या दरांत वाढ खाद्यपदार्थांवरील जीएसटीमुळे छोट्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : पॅकिंग केलेल्या आणि लेबल लावलेल्या सर्व खाद्यपदार्थ, अन्नधान्य, डाळींवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे खाद्यपदार्थ, अन्नधान्य वस्तूंमध्ये सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच ही प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट झाल्याने छोट्या व्यापाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, ‘‘यापूर्वी ब्रॅन्डेड व नॉन ब्रॅन्डेड या शब्दांनुसार टॅक्सेबल वस्तूंचे विभाजन करण्यात आले होते. त्यातही मोठ्या प्रमाणात वादविवाद निर्माण होऊन अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. नव्याने प्रीपॅक्ड व लेबल्ड तसेच वजनावर आधारित करआकारणी केल्यामुळे२५किलो वजनापर्यंतच्या वस्तू करपात्र असतील.परंतु अशा प्रकारच्या अव्यवहार्य तरतुदीमुळे करविषयक न्यायालयीन तंटे वाढतील, असे वाटते.
                                                            
सामान्य ग्राहकांच्या रोजच्या खाद्यान्न वस्तू जीएसटीतून करमुक्त कराव्यात. कररूपाने सरकारचे उत्पन्न मागीलवर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. कोणतीही करप्रणाली लागू करताना व्यावसायिकांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करूनच अंतिम निर्णय  घ्यायला हवा.
- अभय संचेती, अन्नधान्य व्यापारी, मार्केट यार्ड.

रोजच्या वापरातील जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी आकारणी केल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या रोजच्या खर्चामध्ये वाढ होईल.
- आशिष दुगड, संचालक, दी पूना मर्चंट्स चेंबर

नॉन ब्रँडेड मालाला नव्याने ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. तो निर्णय सरकारने रद्द करावा. छोट्या तसेच मोठ्या व्यापाऱ्यांना जीएसटी कायद्यातील नियमांची पूर्तता करणे त्रासदायक ठरणार आहे. त्यासाठी अधिकचा खर्चही सोसावा लागणार आहे.
- उदय चौधरी, किराणा दुकानदार, मार्केट यार्ड

जीएसटीमुळे किमतीत होणारी वाढ (रुपयांमध्ये)
वस्तू -- पूर्वीचे दर -- जीएसटी दर -- झालेली वाढ
डाळी -- ८०-१२० -- ८४-१२६ -- ४-६
पनीर -- ३५० -- ३६२.५ -- १२.५
तांदूळ -- ४०-१०० -- ४२-१०५ -- २-५
कडधान्य -- ७०-१५० -- ७३-१५७ - ३-७
आटा -- ३०-३५ -- ३१-३७ -- १-२
दही -- ६० -- ६३ -- ३
गहू -- ३३-३५ -- ३५-४० -- २
पोहे -- ३८ -- -- ४० -- २
ज्वारी -- ३५ -- ३६.५० -- १.५०

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01907 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top