खाद्यतेलाचा सामान्यांना दिलासा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाद्यतेलाचा सामान्यांना
दिलासा!
खाद्यतेलाचा सामान्यांना दिलासा!

खाद्यतेलाचा सामान्यांना दिलासा!

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या दरात महिनाभरात १५ लिटर/किलोच्या डब्यामागे ३०० ते ७०० रुपयांनी घट झाली आहे. तर किरकोळ बाजारातही किलो/लिटरमागे २० ते ४० रुपयापर्यंतची घट झाली आहे. एकीकडे अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना खाद्यतेल स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
बाजारात शेंगदाणा तेलाचे दर मात्र मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. शेंगदाणा तेलाचे उत्पादन राज्यातच होते. मार्केटयार्डातील भुसार विभागात रोज विविध प्रकारच्या खाद्यतेलाची सुमारे १०० टनाची आवक होते. महिनाभरापूर्वी विविध प्रकारच्या खाद्यतेलाच्या दरांनी उच्चांक गाठला होता. त्यामुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारात खाद्यतेलाची खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत होता. मात्र, आता दरात मोठी घट झाली असल्याचे तेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी सांगितले.
जोपर्यंत जागतिक बाजारपेठेत तुलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत राहील, तोपर्यंत खाद्यतेलाचे दरात वाढ होणार नाही. शहरातही खाद्यतेलाचा पुरवठा सुरळीत आहे. त्यामुळे घाऊक बाजारपेठेसह किरकोळ बाजारातील खाद्यतेलाच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात खाद्यतेलाच्या दराने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

का झाले दर कमी?
- इंडोनेशिया व मलेशियात पाम तेलाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात
- जास्त उत्पादनामुळे तेलाचे दर घटले
- जागतिक बाजारपेठेतही तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात
- त्याचाच परिणाम खाद्यतेलाच्या दरात सातत्याने घट
- शेंगदाणा तेलाचे दर मात्र टिकून

दीडशे लाख टन खाद्यतेल आयात
भारताला वर्षाला २२५ लाख टन तेलाची गरज आहे. देशात दर वर्षी साधारणतः ८० लाख टन तेलनिर्मिती केली जाते. जागतिक बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असलेल्या भारतात दरवर्षांला साधारणतः दीडशे लाख टन खाद्यतेल आयात केले जाते.

येथून होते तेलाची आवक
सूर्यफूल : रशिया, युक्रेन
सोयाबीनः अर्जेंटिना, ब्राझील
पामतेल : स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया
शेंगदाणा : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू,

घाऊक बाजारातील खाद्यतेलाचे १५ लिटर/किलोचे दर
तेलाचा प्रकार - पूर्वीचे दर -- आताचे दर
पाम - २५०० ते २६०० -- १९०० ते २१००
सूर्यफूल - २८०० ते २९०० --२४०० ते २६००
सोयाबीन - २६०० ते २७०० -- २०७० ते २२५०
सरकी तेल - २३०० ते २३५० -- २०५० ते २०८०

तेलाच्या किमती जागतिक बाजारपेठेतील परिस्थितीनुसार कमी अधिक होत असतात. आपण मोठ्या प्रमाणात इतर देशातून खाद्यतेलाची आयात करतो. सध्या जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे दरात मोठी घट झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून पुण्यातही घाऊक आणि किरकोळ बाजारातील तेलाच्या किमतीत मोठी घट झाली आहे.
- रायकुमार नहार, तेलाचे व्यापारी, मार्केटयार्ड

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01912 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top