पोहे, मुरमुरे, रवा महागला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोहे, मुरमुरे, रवा महागला
पोहे, मुरमुरे, रवा महागला

पोहे, मुरमुरे, रवा महागला

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : कमी उत्पादन व कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे पोहे, मुरमुरे, रवा, सुजी, मैदा आणि आटाच्या दरात वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर ही वाढ झाली असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सुमीत गुंदेचा यांनी सांगितले.

मुरमुरे, पोहे यांच्यावर यावेळी जीएसटी आकारण्यात आला आहे. जीएसटीमुळे खाद्यपदार्थांच्या दरात ५ ते ७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. कोरोना काळात देशात मोफत, तसेच अल्प दरात गव्हाचे वाटप करण्यात आले. त्यामुळे सरकारकडील गहू संपला आहे. त्यात धान महागल्याने कंपन्या व्यापाऱ्‍यांना अधिकच्या दराने मालाची विक्री करत आहेत. या सर्व कारणामुळे दरवाढ झाली आहे.

तसेच धानचे (साळ) भाव वाढले आहेत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कच्चा माल येतो. त्यातच मुरमुरे आणि भाजक्या पोह्यावर जीएसटी नव्हता आता मात्र २५ किलोपर्यंतच्या पॅकिंगवर जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळेही दरात भर पडली आहे. देशात गव्हाचा तुटवडा जाणवत असताना गव्हाला मागणी वाढली आहे. त्यामुळे रवा, मैदा, सुजी आणि आटा महागला आहे. घाऊक बाजाराप्रमाणे किरकोळ बाजारातील दरातही मोठी वाढ झाली आहे. श्रावणातही अनेक सण असतात. त्यामुळे पोहे, मुरमुरे, रवा, मैदा, आटा आदीला मागणी वाढत असते.

श्रावणानंतर दसरा, दिवाळी आहे. तसेच गणेशोत्सव ते दिवाळी या काळात सर्व प्रकारच्या मालाला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. त्या काळातही मालाचा असाच तुटवडा राहिल्यास पोहे, मुरमुरा, रवा, मैदा, आटाच्या दरात वाढ होण्याचा अंदाज आहे.
- राजेश शहा, व्यापारी, मार्केट यार्ड.


घाऊक बाजारातील किलोचे दर

वस्तू जून जुलै

दगडी पोहा ३१ ते ३६ ३४ ते ३९
पातळ पोहा ३८ ते ४२ ४२ ते ४६
मुरमुरे ४५ ते ४७ ४९ ते ५१
भडंग ७२ ते ७५ ७८ ते ८१
भाजका पोहा ३७ ते ३९ ४१ ते ४३

घाऊक बाजारातील ५० किलोचे दर

रवा १३५० ते १४५० १५५० ते १६७५
सुजी १३५० ते १४५० १५५० ते १६७५
मैदा १३०० ते १४५० १५५० ते १७००
आटा १३०० ते १४५० १४०० ते १५००

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01924 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top