मंडई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंडई
मंडई

मंडई

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. १४ : बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर आहे. मात्र, स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवारी सुट्टी असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. परिणामी कांदा, बटाटा, मटार, हिरवी मिरची, काकडी आणि पापडीच्या भावात वाढ झाली असून इतर सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता. १४) राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. परराज्यांतून कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशमधून हिरव्या मिरचीची १० ते १२ ट्रक, कर्नाटकातून कोबी ४ ते ५ ट्रक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून ३ ते ४ टेम्पो शेवगा, कर्नाटकमधून ३ ते ४ टेम्पो घेवडा, इंदौरहून ७ ते ८ टेम्पो गाजर, मध्य प्रदेशातून लसणाची ७ ते ८ ट्रक इतकी आवक झाली.

राज्याच्या विविध भागांतून झालेल्या आवकमध्ये सातारी आल्याची ६०० ते ७०० पोती, भेंडीची ७ ते ८ टेम्पो, गवारची ५ ते ६ टेम्पो, टोमॅटोची १४ ते १५ हजार क्रेट, फ्लॉवरची १० ते १२ टेम्पो, कोबीची ५ ते ७ टेम्पो, सिमला मिरचीची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांद्याची ७० ते ८० ट्रक, बटाटा आंध्र प्रदेश आणि इंदूर येथून ३५ ते ४० ट्रक बटाटा इतकी आवक झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : १००-१७०, बटाटा : १८०-२२०, लसूण : ५०-४००, आले सातारी : १५०-४००, भेंडी : ४००-५५०, गवार : गावरान व सुरती : ५००-८००, टोमॅटो : १००-१६०, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ५००, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : ३००-४००, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी :२००-२५०, पापडी : ४५०-५००, पडवळ : २००-२५०, काकडी : १६०-२००, फ्लॉवर : १००-१६०, कोबी : १५०-२००, डिंगरी : २५०-३००, नवलकोल : १४०-१५०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-२००, शेवगा : ४००-५००, गाजर : ३५०-४५०, वालवर : ४००-४५०, बीट : १२०-१४०, घेवडा : ५५०-६००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ४००-४५०, मटार : स्थानिक: ५००-६००, पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा: ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.


पालेभाज्या भावात वाढ

छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने कोथींबीर, कांदापात, चाकवत, पुदीना, चवळई आणि पालकच्या भावात वाढ झाली आहे, तर शेपू आणि राजिगऱ्याच्या दरात घट झाली आहे. मेथी, करडई, अंबाडी, मुळे आणि चुका यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. रविवारी मार्केटयार्डात कोथींबीर पावणेदोन लाख आणि मेथीची ५० हजार जुड्यांची आवक झाली आहे.

घाऊक बाजारात जुडीमागे कोथिंबिरीच्या भावात तब्बल पाच रुपयांनी वाढ झाली आहे. कांदापात तीन रुपये, पुदीना आणि पालक दोन रुपये, चवळई आणि चाकवत प्रत्येकी एक रुपयांनी जुडीमागे वाढ झाली आहे. तर राजगिऱ्याच्या भावात दोन तर शेपूच्या भावात जुडीमागे एक रुपयांनी घट झाली आहे, अशी माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली. पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १०००-२०००, मेथी : ६००-१०००, शेपू : ३००-७००, कांदापात : १२००-१५००, चाकवत : ५००-७००, करडई : ४००-६००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-६००, मुळे : १०००-१५००, राजगिरा : ४००-६००, चुका : ७००-१०००, चवळई : ५००-७००, पालक : ७००-१२००.
-----------

फळबाजार

लिंबू, खरबूज आणि चिक्कूच्या भावात वाढ
पुणे मार्केटयार्डातील फळबाजारात सीताफळ, पपई आणि पेरूच्या भावात घट झाली असून लिंबू, खरबूज आणि चिक्कूच्या भावात वाढ झाली आहे, तर अननस, डाळिंब, संत्री, मोसंबी आणि कलिंगडाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.लिंबू एक हजार दोनशे ते दीड हजार गोणी, डाळिंब सुमारे ४० ते ५० टन, पपई ८ ते १० टेम्पो, कलिंगड ५ ते ७ टेम्पो, खरबूज सुमारे ३ ते ४ टेम्पो, पेरू ७०० ते ८०० के्रट, अननस ४ ट्रक, मोसंबी ४० ते ५० टन, संत्री दोन टन, सीताफळ ८ ते १० टन, चिक्कू एक हजार बॉक्स इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : ५००-८००, डाळिंब (प्रति किलो) : भगवा : ४०-१४०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-६०. कलिंगड : ७-१०, खरबूज : १५-१८, पपई : १८-२०, अननस (एक डझन) ७०-२७०, पेरू (२० किलो) २००-४००. मोसंबी (तीन डझन) ८०-२५०, (चार डझन) २५-८०, संत्री (दहा किलो) ३००-८००, सीताफळ (एक किलो) २०-१२०, चिक्कू (१० किलो)१००-५००


फुलांना मागणी वाढली
गुलटेकडी मार्केटयार्डातील फूलबाजारात फुलांची आवक वाढली असून श्रावण महिन्यातील सणवारांमुळे मागणीही चांगली आहे. रविवारी स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली असल्याची माहिती फुलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण विर यांनी दिली. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : १०-३०, गुलछडी : १२०-२००, बिजली : ८०-१३०, कापरी : २०-४०, आॅष्टर : जुडी १५-३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-४०, गुलछडी काडी : ५०-१००, डच गुलाब (२० नग) : ८०-१५०, जर्बेरा : ७०-१००, कार्नेशियन : १५०-२००.

08371

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01933 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..