आवक घटल्याने फळभाज्या शंभरी पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आवक घटल्याने फळभाज्या शंभरी पार
आवक घटल्याने फळभाज्या शंभरी पार

आवक घटल्याने फळभाज्या शंभरी पार

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : सततच्या पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून बाजारातील आवक निम्म्याने घटली आहे. त्यातच श्रावण महिना सुरू असल्यामुळे बाजारात मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाज्यांच्या भावात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

बाजारातील बहुतांश फळभाज्या शंभरीच्या घरात पोहचल्या आहेत. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा चटका सहन करत असतानाच नागरिकांना आता भाज्यांच्या भाववाढीचा सामना करावा लागत आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे भाव वाढले असल्याने किरकोळ बाजारातही भाववाढ झाली आहे. बाजारात भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मटार, गवार, दोडक्याच्या भावाने तर किरकोळ बाजारात शंभरी ओलांडली आहे. कोथिंबीर एक जुडी ३५ रुपयांवर गेली असल्याचे किरकोळ फळभाज्या विक्रेते प्रकाश ढमढेरे यांनी सांगितले.

कोंथिबीर, मेथी, पालक मटार, शेवगा, गवार, दोडका यासह विविध फळभाज्यांचे भाव वाढले आहेत. जोपर्यंत बाजारात भाज्यांची आवक वाढणार नाही, तोपर्यंत हेच भाव कायम राहतील असे ज्येष्ठ व्यापारी विलास भुजबळ यांनी सांगितले.

पावसामुळे भाज्यांची आवक मंदावली आहे, तसेच नुकसानही झाले आहे. त्यामुळे पालेभाज्या आणि फळभाज्यांच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली. मार्केट यार्डात पुणे विभागासह, सातारा, सोलापूर यासह विविध जिल्ह्यातून पालेभाज्या व फळभाज्यांची आवक होते.
- अमोल घुले, व्यापारी, मार्केट यार्ड


भाज्यांचे किरकोळ बाजारातील भाव
शेवगा - १००
गवार - १४०
मटार - १२०-१४०
घेवडा -१३०-१६०
वांगी १००
दोडका १२०
---------
पालेभाज्यांचे भाव
कोथिंबीर ३५
मेथी ३०-४०
पालक ३०-४०
मुळा ३०
कांदापात ३०

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01942 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..