‘किरकोळ व्यावसायिकांना परदेशी कंपन्यांनी धरले वेठीस’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘किरकोळ व्यावसायिकांना परदेशी कंपन्यांनी धरले वेठीस’
‘किरकोळ व्यावसायिकांना परदेशी कंपन्यांनी धरले वेठीस’

‘किरकोळ व्यावसायिकांना परदेशी कंपन्यांनी धरले वेठीस’

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : ‘‘किरकोळ, कॉर्पोरेट रिटेल, ई-कॉमर्स आणि थेट विक्री (डायरेक्ट सेलिंग) या चार प्रमुख क्षेत्रांसह भारताचा व्यवसाय वेगाने विस्तारत आहे. त्यात थेट विक्री वगळता इतर तीन क्षेत्रासाठी कोणतेही निर्बंध नसल्याने बहुराष्ट्रीय कंपन्या चुकीच्या पद्धतीने सवलतीसारख्या घातक धोरणांचा अवलंब करून आपली मक्तेदारी प्रस्थापित करीत आहेत. त्यामुळे देशातील पारंपरिक व्यापार धोक्यात आला आहे,’’ असे स्पष्ट मत कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी व्यक्त केले.

देशातील छोटे व्यापारी आणि रिटेल व्यवसाय हे लोकशाही पद्धतीने चालविण्यासाठी नियामक प्राधिकरणाची गरज आहे, यासाठी कॅटने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना प्रभावी पावले उचलण्याची विनंती केली असून, तसे निवेदन बाठिया यांनी त्यांना दिले आहे. त्यात म्हटले आहे, की पारंपरिक व्यापार करणाऱ्यांवरच सरकार निर्बंध घालत आहे, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना कोणतेही निर्बंध किंवा मार्गदर्शक तत्त्वे न घातल्याने त्यांना मोकळे रान मिळाले आहे. यामुळे भारतीय रिटेल क्षेत्र हे या परदेशी मोठ्या कंपन्यांनी वेठीस धरले आहे. मोठ्या कंपन्यांच्या अनियंत्रित व्यवसाय पद्धतींमुळे एक लाखाहून अधिक दुकाने, मुख्यतः मोबाईल व्यवसाय आतापर्यंत बंद पडल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने म्हटले आहे.

दरम्यान, परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांना सुरक्षित मार्ग दिल्याने व्यापारी प्रचंड निराश झाले आहेत. बड्या कंपन्या कायद्याचा आणि नियमांचा आदर करत नाहीत, तर छोटे व्यावसायिकच छोट्या चुकांना बळी पडत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01957 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..